पुणे, 21 ऑक्टोबर : वेदांत- फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यामुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली होती. पण, आता महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी मध्यप्रदेशमध्ये गुंतवणूक करावी म्हणून आज मध्यप्रदेश सरकारने पुण्यात इन्वेस्टर मीटचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे स्वत: हजर असून महाराष्ट्रापेक्षा आमच्याकडे जमीन स्वस्त, आमच्याकडे या, असं आवाहनच त्यांनी केलं आहे. दिवाळीलाच काका-पुतण्यांना साखर कडू, रोहित पवारांनंतर अजितदादांनाही धक्का! महाराष्ट्रापेक्षा आमच्याकडे जमीन स्वस्त आहे. आमच्याकडे या. आमच्याकडे वीज, पाणी भरपूर आहे. चंबळचे डाकू संपवले आहे. आमच्याकडे कोणतीही गुंडागर्दी केली तर मामांचा बुलडोझर चालवतो. डायरेक्ट, नक्षलवाद संपवला आहे. आता तुम्ही येऊ शकता. स्किल्ड मॅनपॅावर आमच्याकडे आहे, असं आवाहनच चौहान यांनी केलं आहे. चौहान म्हणाले, की काही राज्य फक्त कार्यक्रम घेतात आणि बोलवतात. एका मिनिटात सगळं करून देऊ सांगतात आणि गेलात की काम सुरू केल्यावर अडचणी निर्माण करतात. आमच्याकडे या मी आहे. असं काहीही होणार नाही. ऑटोमोबाईल, आयटी सेक्टरने विचार करावा, ईव्हीचा पार्क बनवतोय, असंही चौहान यावेळी म्हणाले. Uday Samant : उद्धव ठाकरेंची बेहिशोबी मालमत्ता आहे का? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं दरम्यान, यापूर्वी फॅाक्सकॅान वेदांताचा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राच राजकारण तापलं होतं. आता मध्यप्रदेश सरकारने थेट कार्यक्रम आयोजित करून उद्योजकांना आमंत्रित केल्याने पुन्हा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. देशातील परदेशी गुंतवणूक आपल्या राज्यात नेण्याबरोबरच आता दुसऱ्या राज्यातील देशी गुंतवणूकही आपल्या राज्यात नेण्याच्या प्रयत्न चौहान यांच्याकडून सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.