औरंगाबाद 01 ऑगस्ट : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने मध्यरात्रीनंतर अटक केली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना ईडीने अटक केली असली, तरीही चौकशीत जे सत्य आहे ते नक्की समोर येईल, असं ते म्हणाले. संजय राऊतांच्या अटकेनंतर भाऊ सुनील यांची पहिली प्रतिक्रिया, ED वर गंभीर आरोप यासोबतच मुख्यमंत्री म्हणाले, की ईडीच्या त्रासाला घाबरून आमच्याकडे किंवा भाजपकडे येण्याचं पुण्यकाम करू नका. कारवाईची भीती वाटत असेल म्हणून आमच्यासोबत यावं, यासाठी आमचा कुणावरही दबाव नाही. संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्यासाठी सुडाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की अशा काही भीतीमुळे आलेली माणसं आम्हाला आमच्याकडे नको आहेत.’ एकनाथ शिंदे म्हणाले, मी पुन्हा एकदा जाहीर आवाहन करतो की, कोणाच्या मागे यंत्रणा लागली असेल तर आमच्याकडे आणि भाजपकडे येऊ नका. कोणावर दबाव टाकून आम्ही त्यांना आमच्यात घेतलेलं नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. VIDEO: कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर टपरीवर चहा प्यायला थांबले मुख्यमंत्री, बिल देताना म्हणाले… संजय राऊत यांनी माझ्यावर आणि माझ्यासोबत असलेल्या 50 आमदारांवर अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. तरीही आम्ही तसं काही करणार नाही. आमच्या कामातूनच आम्ही त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देऊ, असं एकनाथ शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे. संजय राऊत यांच्यावरील कारवाई कायदेशीर आहे, त्याबद्दल जास्त बोलता येणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.