औरंगाबाद 01 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसांचा दौरा रात्री 3 वाजून 30 मिनिटांनी संपला. पहाटे चार वाजता ते खासगी विमानाने मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान सिल्लोड ची सभा संपवून मुख्यमंत्री औरंगाबादकडे निघाले असताना अब्दुल सत्तारही त्यांच्यासोबत होते. यावेळी एका कार्यकर्त्याच्या आग्रहानंतर मुख्यमंत्र्यांनी टपरीवर चहा प्यायला. संजय राऊतांच्या अटकेनंतर भाऊ सुनील यांची पहिली प्रतिक्रिया, ED वर गंभीर आरोप मुख्यमंत्री औरंगाबादकडे निघाले असताना अब्दुल सत्तार सोबत होते. इतक्यात सत्तार यांच्या कार्यकर्त्यांचा फोन त्यांना आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चहा पिण्यासाठी माझ्या टपरीवर आणा, अशी मागणी कार्यकर्त्याने केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासाठी होकार दिला आणि मुख्यमंत्र्यांचा लवाजमा टपरीवर थांबला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी टपरीवरील चहाचा आस्वाद घेतला.
औरंगाबाद : कार्यकर्त्याच्या आग्रहानंतर मुख्यमंत्र्यांनी टपरीवर घेतला चहाचा आस्वाद pic.twitter.com/zpPXYJRKpz
— News18Lokmat (@News18lokmat) August 1, 2022
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारही उपस्थित होते. चहा प्यायल्यानंतर सगळ्यांच्या चहाचं बिल मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः खिशातून काढून दिलं. चहा प्यायला तर बिल द्यावेच लागेल ना, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी रावसाहेब दानवे त्यांच्या बाजूलाच उभे होते. याचे व्हिडिओही समोर आले आहेत. भाजपने शब्द पाळला, पण उद्धव ठाकरे खोटं बोलले? एकनाथ शिंदेंचं मोठं विधान दरम्यान संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना ईडीने अटक केली असली तरीही चौकशीत जे सत्य आहे ते नक्की समोर येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे.