जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 50 खोक्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं बंगाल धाडीचं लॉजिक, 27 कोटीला ट्रक लागला मग 50 कोटींना..

50 खोक्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं बंगाल धाडीचं लॉजिक, 27 कोटीला ट्रक लागला मग 50 कोटींना..

50 खोक्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं बंगाल धाडीचं लॉजिक

50 खोक्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं बंगाल धाडीचं लॉजिक

नंदूरबार येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 खोक्यांच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नंदूरबार, 29 ऑक्टोबर : शिंदे गट शिवसेनेतून फुटल्यापासून ठाकरे गट त्यांच्यावर सडकून टीका करत आहे. यातील मुख्य आरोप 50 कोटी अर्थात 50 खोके घेतल्याचा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनीच शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांच्यावर 50 खोके घेतल्याचा आरोप केला. यामुळे वातावरण आणखी चिघळले आहे. यावर आता खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये धाड पडली तेव्हा 27 कोटी रुपयांसाठी टेम्पो लागला. मग 50 कोटींचे ट्रक का दिसले नाही? लोकांची दिशाभूल करू नका, पैशाच्या लालसेपोटी हे 40 आमदार माझ्यासोबत आले नाहीत. या पनान्स लोकांना बदनाम करण्याचं काम तुम्ही कराल तेवढं खड्यात लोक तुम्हाला टाकतील, जनाची नाही तर मनाची ठेवा. यामुळे शिवसैनिकांचं खच्चीकरण होत असल्याचा पलटवार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. नंदूरबार येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. विरोधकांना मी कामातून उत्तर दिलं : मुख्यमंत्री औद्योगिक प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे यावरून जो काहूर माजला आहे, त्याला योग्यवेळी घटनांनी स्वतः उत्तर देईल, सध्या उद्योगमंत्री याबाबत बोलत आहेत. विरोधकांना मी कामातून उत्तर दिलं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. वाचा - ‘कडू’ वाद होणार गोड, मुख्यमंत्री शिंदेंनी रवी राणांना वर्षा बंगल्यावर बोलावलं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? प्रत्येक प्रकल्प वेळेआधी करण्याचा माणस आहे, 72 मोठे निर्णय या सरकारने घेतले. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना मदत केली. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदतीसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत.

News18लोकमत
News18लोकमत

3 मिनिटात स्टेजवरून नगरपालिकेचे 7 कोटी 28 लाख देणारे हे गतिमान सरकार आहे. बंद जल सिंचन प्रकल्पांना चालना दिली. यामुळे अनेक हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. सर्व सामन्याची दिवाळी गोड व्हावी यासाठी 7 कोटी लोकांना 100 रुपयात आनंद शिधा दिला. हे सरकार काम करणार सरकार आहे, एकाच योजनेचे 15000 कोटी दिले. गेले अडीच महिने आणि अडीच वर्षांच्या कामाचा लेखाजोखा पाहून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे अनेक कामाला लागले, याचं प्रमुख कारण हा एकनाथ शिंदे आहे. जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असते. धर्मवीर चित्रपटात एक डायलॉग आहे, गद्दरांना क्षमा नाही, ज्यांनी बाळासाहेब यांच्या विचारांशी गद्दारी केली त्यांना क्षमा नाही, बाळासाहेब ठाकरे आणी मोदींचे फोटो लावून मते मागितली, मग गद्दारी कोणी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात