अमरावती, 29 ऑक्टोबर : 50 खोके घेण्याच्या आरोपावरून आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातला वाद चांगलाच पेटलाा आहे. बच्चू कडू यांनी रवी राणांना 1 तारखेचं अल्टिमेटम दिला आहे. या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. रवी राणांना भेटीसाठी बोलावलं आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या आमदार रवी राणा यांना निरोप पाठवला आहे. उद्या मुंबईत सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रवी राणा यांची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. गुवाहाटीला जाऊन खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. त्यामुळे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. आता उद्या (30 ऑक्टोबर) यावर वर्षा बंगल्यावर काय तोडगा निघतो हे पाहण्याचे ठरणार आहे. (Pruthviraj Chavhan : राष्ट्रवादीमुळेच भाजपची राज्यात सत्ता आली, काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट) दरम्यान, आमदार राणा आणि बच्चू कडू यांच्यातल्या वादात आता राणांच्या कार्यकर्त्यांच्य्या बैठका सुरू झाल्या आहेत. राणांचे कार्यकर्ते देखील आंदोलन करून जश्याच तसे उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. मात्र रवी राणा यांनी बच्चू कडूंविरोधात आंदोलन करू नये, असं कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन देखील आमदार रवी राणा यांनी केलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, कुठलाही प्रकारचा आरोप प्रत्यारोप करू नये, असं रवी राणा त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. ( ठाकरे गटाच्या आमदाराचे 6 दिवस आमरण उपोषण, जिल्हाधिकाऱ्यांनी काढला थेट आदेश ) बच्चू कडू यांचा इशारा दरम्यान, ‘रवी राणा हे आपण देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांच्या जवळचे आहोत, असं सांगतात, त्यामुळे या आरोपांमागे कुणाची फूस तर नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं आणि स्टंटबाज रवी राणा यांना समज द्यावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ते मला योग्य तो न्याय देतील, अशी अपेक्षा बच्चू कडूंनी व्यक्त केली. माझ्या मागणीवर 1 तारखेपर्यंत विचार केला नाही तर आम्ही आमची भूमिका घेऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.