जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'हो.. मी कंत्राटी मुख्यमंत्री, पण...', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विधानसभेतला रोखठोक VIDEO

'हो.. मी कंत्राटी मुख्यमंत्री, पण...', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विधानसभेतला रोखठोक VIDEO

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एका ठिकाणी भाषण करताना राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे कंत्राटी मुख्यमंत्री आहेत, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाला एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत रोखठोक प्रत्युत्तर दिलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रचंड फटकेबाज केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एका ठिकाणी भाषण करताना राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे कंत्राटी मुख्यमंत्री आहेत, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाला एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत रोखठोक प्रत्युत्तर दिलं. ‘हो, मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे’, असं मुख्यमंत्री सभागृहात ठासून म्हणाले. “हो, मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे ना. महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट मी घेतलेलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलेलं आहे. गोरगरिब सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा आणि त्यांचे अश्रू पुसण्याचा कंत्राट मी घेतलेला आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचं दु:ख दूर करण्याचं कंत्राट मी घेतलेलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेण्याचं कंत्राट मी घेतलेलं आहे. बहुजनांचा सर्वांगीण विकासाचा देखील कंत्राट मी घेतलेला आहे. असंघाशी संघ करण्यापेक्षा कंत्रााटी केव्हाही बरा”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.

जाहिरात

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. राज्यात वाढते गुन्हे चिंतेची बाब असल्याचं पवार विधानसभेत म्हणाले. त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख केला. यावेळी सभागृहात चांगलाच हशा पिकला. ( ‘मी इंदिरा गांधींचा फॅन’, मोदींचं कौतुक करताना शिंदे काय म्हणाले? पाहा VIDEO ) अजित दादा तुम्ही आम्हाला एवढा क्राईम रेट वाढलेला आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे, असे दाखले दिले. माझा सांगण्यााचा उद्देश असा आहे की, ठाण्यातील डान्सबार सगळे बंद आहेत. ते पूर्वीचे व्हिडीओ क्लिप दाखवत आहेत. इथे जितेंद्र आव्हाड साहेब आहेत. त्यांना माहिती आहे. ते तिकडे (मुख्यमंत्री मिश्किलपणाने हसले), अरे मी काही तुमच्याबद्दल वाईट बोलत नाहीय. तुम्ही जाता म्हणून नाही सांगत मी बघायला. (सभागृहात हशा). मी काय म्हणालो? डान्सबार आपल्याकडे बंद आहेत. जितेंद्र आव्हाड काहीतरी म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा बोलायला लागले. झालं आता. तुमच्याबद्दल चांगलं बोलणंही वाईट आहे. मग वाईट बोलू? दुसरं सांगू इथे सर्वांना? (सभागृहात पुन्हा हशा). यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी तुमच्यावर बोलणार नाही. तुम्ही माझ्याबद्दल बोलू नका. (सभागृहात पुन्हा हशा).

अंमली पदार्थाच्या बाबतीत जून 2022 च्या अखेरपर्यंत 6 हजार 645 गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईत 1400 कोटींचे एमडी पकडले. पोलीस अंमली पदार्थांना आळा घालण्याचं काम करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात