अमरावती, 27 सप्टेंबर: शिवसेना नेते (Former Shiv Sena leader) आणि अमरावतीचे माजी खासदार माजी मंत्री आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत अडसूळ (Abhijeet Adsul) यांना ईडीने (Summoned by the ED) समन्स बजावले आहेत. सिटी बँक घोटाळा (Citibank scam case) प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलेत. आज सकाळी त्यांना साडेआठ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अडसूळ दिल्लीला (Delhi) जाणार असल्यानं हजर राहणार नाहीत, अशी माहिती मुलगा अभिजित अडसूळ यांनी दिली आहे.
दरम्यान आज सकाळी ED चे अधिकारी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरी गेल्याची माहिती आहे. सिटी बँक घोटाळा प्रकरणी बडनेराचे युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून ही कारवाई झाल्याचं बोललं जात आहे. आम्ही सर्व चौकशीला जायला तयार आहे. पण राणा केसचा निकालही निपक्षपाती हवा अशी मागणी अभिजीत अडसूळ यांनी केली आहे.
City Co-operative bank fraud | Shiv Sena leader Anandrao Adsul summoned by Enforcement Directorate (ED) for questioning. He will appear before ED in Mumbai today. (File photo) pic.twitter.com/b37G1F3kCF
— ANI (@ANI) September 27, 2021
सिटी बँकेत 900 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भाजप आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे.
हेही वाचा- शिवसेनेचा असुद्दीन ओवेसींवर निशाणा, भाजपलाही फटकारलं
अडसूळ यांच्यावरील आरोप
5 जानेवारी रोजी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप केला. अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्र सादर करण्यासाठी राणा ईडीच्या कार्यालयातही गेले होते. मुंबईमध्ये सिटी को-ऑप बँकेच्या 13 ते 14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार असून ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटण्यात आलेलं कर्ज कारणीभूत असल्याचा आरोप रवी राणा यांच्याकडून करण्यात आला होता. अडसूळ यांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. खातेदारांना फक्त एक हजार एवढी रक्कम मिळत असल्याचंही रवी राणा यांनी आपल्या आरोपात म्हटलं होतं.
पुन्हा एकदा अनिल परबांना ईडीचे समन्स
दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Maharashtra Transport Minister Anil Parab) यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने पुन्हा एकदा समन्स (ED summons to Anil Parab) बजावले आहे. त्यानुसार आता 28 सप्टेंबर रोजी अनिल परब यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणी अद्याप अनिल परब यांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.
हेही वाचा- भारत बंद! तीन वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात आज भारत बंदची हाक
मिळालेल्या माहितीनुसार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीने हा समन्स बजावला आहे. सचिन वाझे गृहविभागातील बदल्यांच्या संदर्भात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला होता. तसेच सचिन वाझे याने दिलेल्या आपल्या कथित स्टेटमेंटमध्ये अनिल परब यांच्यावर आरोप करत म्हटलं होतं की, बदल्या थांबवण्यासाठी अनिल परब यांना 20 कोटी रुपये मिळाले होते.
हेही वाचा- मोठी बातमी: इंदौर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले, Watch Video
यापूर्वीही अनिल परब यांना ईडीचा समन्स
अनिल परब यांना यापूर्वी सुद्धा ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी हजर राण्यास सांगितले होते. मात्र, अनिल परब हे त्यावेळी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर आता ईडीने पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena