पुणे, 27 सप्टेंबर: मुंबई-पुणे (Mumbai Pune) रेल्वे मार्गावर अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. इंदौर- दौंड एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ घसरले. लोणावळा रेल्वे स्टेशन जवळ पावणे आठ वाजता ही घटना घडली आहे. या अपघातामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे पुन्हा रूळावर आणण्याचं काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. मुंबईहून पुण्याला ही रेल्वे निघाली होती. त्यावेळी लोणावळा स्टेशनवरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर रेल्वे थांबताना अचानक बोगी घसरल्या. रेल्वेच्या मागच्या बाजूच्या या दोन्ही बोगी आहेत. त्यात प्रवासी देखील होते. गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
हेही वाचा- शिवसेनेचा असुद्दीन ओवेसींवर निशाणा, भाजपलाही फटकारलं
प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली आहे. इंदौर एक्सप्रेस सकाळी सात वाजून 57 वाजता मिनिटांनी लोणावळा रेल्वे स्थानकात दाखल होत होती. त्यावेळीच ही घटना घडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.