मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उत्तर प्रदेश निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा असुद्दीन ओवेसींवर निशाणा, भाजपलाही फटकारलं

उत्तर प्रदेश निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा असुद्दीन ओवेसींवर निशाणा, भाजपलाही फटकारलं

पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभा निवडणूक (Assembly Election)  होणार आहे.

पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार आहे.

पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 27 सप्टेंबर: पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच MIMIMनं पूर्ण ताकदीनं उतरण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून MIMचे प्रमुख असुद्दीन ओवेसी (Asuddin Owaisi) उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी सभा घेत आहे. त्यावर आता शिवसेनेनं ओवेसींवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ओवेसी यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. यासह शिवसेनेनं भाजपलाही (BJP)फटकारलं आहे. फोडा-झोडा व जिंका या मथळ्याखाली सामनातील आजचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

मुसलमान या देशाचे नागरिक आहेत आणि त्यांनी या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे असे सांगण्याची हिंमत ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी ओवेसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हेही वाचा- मुंबईत आज फक्त महिलांचं लसीकरण, पालिकेचा निर्णय; थेट केंद्रावर मिळेल लस

आजच्या अग्रलेखात असुद्दीन ओवेसी हे भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

काय आहे आजच्या अग्रलेखात

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत काय काय पाहावे लागेल, घडवले जाईल ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाच्या यशस्वी वाटचालीचे पडद्यामागचे सूत्रधार मियाँ असदुद्दीन ओवेसी व त्यांचा पक्ष चांगलाच कामाला लागल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निमित्ताने जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याची पूर्ण तयारी ओवेसी महाशयांनी केलेली दिसते.

ओवेसी हे राष्ट्रभक्तच आहेत. बॅ. जिना यांच्याप्रमाणे ते उच्चशिक्षित, कायदेपंडित आहेत, पण त्याच जिना यांनी राष्ट्रभक्तीचा बुरखा पांघरून ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा दिला. देशाची फाळणी हा कट होता व त्यामागे ब्रिटिशांची फोडा-झोडा व राज्य करा हीच नीती होती. आज ओवेसींच्या सभांमधून ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे उठत आहेत. त्यामागेही राजकीय सूत्र आहेच. फोडा, झोडा आणि विजय मिळवा. ओवेसी यांनाही त्याच विजयाचे सूत्रधार म्हणून वापरले जात आहे. पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपचे राजकारण पुढे सरकणार नाही का?

हेही वाचा- भारत बंद! तीन वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात आज भारत बंदची हाक

दोन दिवसांपूर्वी ओवेसी हे प्रयागराजवरून लखनौला जात असताना वाटेत त्यांचे समर्थक जमले व त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे लावले. इतके दिवस उत्तर प्रदेशात अशा प्रकारचे नारे लागल्याची नोंद नाही, पण उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने ओवेसी येतात काय, ठिकठिकाणी भडकावू भाषणे करतात काय, त्यांच्या बेबंद समर्थकांची डोकी भडकवतात काय आणि मग ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची नारेबाजी सुरू होते काय, हा सर्व प्रकार पटकथालेखन ठरवल्याप्रमाणे सुरू असल्याच्या संशयास बळकटी येत आहे.

रायबरेलीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणा म्हणजे राष्ट्रभक्तांच्या छातीवर केलेले वार आहेत. ओवेसी व त्यांच्या एमआयएम पक्षाचे नक्की ध्येयधोरण काय आहे? मुसलमानांवरील अन्यायाचा डंका पिटत हे महाशय देशभर फिरत आहेत. त्यांच्या राजकारणाचे प्रायोजकत्व कोणी वेगळेच लोक करीत असावेत. देशातील मुसलमान शहाणा झाला आहे. त्याला आपले हित कशात आहे हे आता समजू लागले आहे. ‘ओवेसी’सारख्यांना येथील मुसलमान नेता मानायला तयार नाहीत. ओवेसी किंवा त्यांच्यासारखे पुढारी आतापर्यंत अनेकदा निर्माण झाले व काळाच्या ओघात नष्ट झाले. देशाच्या राजकारणात मुस्लिम समाजाला डावलता येणार नाही. मुस्लिमांनी राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय त्यांना त्यांचे हक्क, प्रतिष्ठा मिळणार नाही हे सांगण्याचे धाडस ओवेसी यांच्यासारखे नेते दाखविणार नसतील तर आतापर्यंत मतविभागणी करून आपल्या सुपारीबाज मायबापांना मदत करणाऱयांपैकी एक असेच ओवेसींचे नेतृत्व राहील.

हेही वाचा- 65 तासांत पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत घेतल्या 20 बैठका 

तिहेरी तलाकसारख्या संवेदनशील विषयात मानवताविरोधी भूमिका कशी काय घेतली जाऊ शकते? तिहेरी तलाकवर कायद्याने बंदी आणून सरकारने चांगले काम केले व लाखो मुसलमान महिलांची गुलामीच्या जोखडातून सुटका केली; पण ज्या धर्मांध पुढाऱ्यांनी, मुल्ला-मौलवींनी या कायद्यास विरोध केला, त्यांच्या पाठीशी मियाँ ओवेसी उभे राहिले. त्यामुळे मुसलमानांच्या कोणत्या हक्क व अधिकारांची भाषा ओवेसी करीत आहेत?

First published:

Tags: Asaduddin owaisi, Sanjay Raut (Politician), Shivsena, Uttar paredesh