Home /News /national /

Bharat Bandh Today: आज भारत बंद, केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात एल्गार; शेतकरी संघटनांना राजकीय पक्षांचाही पाठिंबा

Bharat Bandh Today: आज भारत बंद, केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात एल्गार; शेतकरी संघटनांना राजकीय पक्षांचाही पाठिंबा

Bharat Bandh Today: संयुक्त किसान मोर्चानं (Samyukta Kisan Morcha) आज 'भारत बंद' (bharat bandh) ची हाक दिली आहे.

    नवी दिल्ली, 27 सप्टेंबर: केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या (Agriculture Bill) विरोधात संयुक्त किसान मोर्चानं (Samyukta Kisan Morcha) आज 'भारत बंद' (bharat bandh) ची हाक दिली आहे. मागील जवळपास दीड वर्षांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन (farmer protest) करत आहे. केंद्र सरकारने पारीत केलेल्या नवीन तीन कृषी कायद्याच्या (Three new agricultural act) विरोधात लढा सुरू ठेवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने (Sanyukta Kisan Morcha) आज 'भारत बंद'ची (Bharat Bandh) घोषणा केली. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. काँग्रेस पक्षानंही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर आजच्या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आजच्या भारत बंदमुळे काही राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. स्थानिक पातळीवरही पोलीस बंदोबस्त राहणार आहे. तसंच आज बाजार समित्या, शहरातील मुख्य मार्केट यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सकाळी 6 पासून दुपारी 4 वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. या बंद दरम्यान देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, शैक्षणिक आणि इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील. तसंच सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही आहेत. दरम्यान रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या 40 शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने लोकांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे, दिल्ली सरकारने भारत बंदला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने केलं आवाहन लोकशाही आणि संघराज्य तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी राजकीय पक्षांनी देखील भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने सांगितलं की, सोमवारी (27 सप्टेंबर) सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत भारत बंदचं आयोजन करण्यात आलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Bharat bandh 2021, Farmer protest

    पुढील बातम्या