• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ताजी बातमी: एअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे हवाई दल प्रमुख, मोदी सरकारचा निर्णय

ताजी बातमी: एअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे हवाई दल प्रमुख, मोदी सरकारचा निर्णय

एअर मार्शल व्ही. आर. चौधरी हे नवे वायूदल प्रमुख असतील, अशी घोषणा (Air Marshal V. R.Choudhary to become new chief of Air Staff) केंद्र सरकारनं (Central Government) केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : भारताचे नवे हवाई दल प्रमुख (New Chief of Air Staff) कोण असणार, याचं उत्तर अखेर मिळालं आहे. एअर मार्शल व्ही. आर. चौधरी हे नवे हवाई दल प्रमुख असतील, अशी घोषणा (Air Marshal V. R.Choudhary to become new chief of Air Staff) केंद्र सरकारनं (Central Government) केली आहे. चौधरी हे सध्या उप हवाई दल प्रमुख आहेत. विद्यमान हवाई दल आरकेएस भदौरिया हे लवकरच निवृत्त होणार (Air Chief RKS Bhadoriya to retire from service) असून त्यापूर्वी नव्या प्रमुखांची घोषणा करण्याची पद्धत आहे. त्यानुसार नव्या वायूदल प्रमुखांच्या नावाची केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. देदिप्यमान कारकीर्द एअर मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी हवाई दलातील कारकीर्द देदिप्यमान राहिली आहे. याच वर्षी 1 जुलै रोजी त्यांनी उप वायूदल प्रमुखपदाचा भार स्विकारला होता. 29 डिसेंबर 1982 या दिवशी एअर मार्शल चौधरी हे वायूदलाच्या सेवेत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी सातत्यपूर्ण आणि अभिमानास्पद कामगिरी करत आपल्या कर्तृत्वाचा आलेख चढता ठेवला आहे. आतापर्यंत एअर मार्शल चौधरी यांच्या नावे तब्बल 3800 तासांपेक्षा अधिक विमान उड्डाणाचा अनुभव आहे. एवढा प्रदीर्घ विमान उड्डाणाचा अनुभव असणारे फारच कमी अधिकारी भारतीय वायुदलाकडे आहेत. त्यापैकी एअर मार्शल चौधरी एक आहेत. त्यांच्या गळ्यात आता हवाई दल प्रमुखपदाची माळ पडणार आहे. हे वाचा - Shocking! बायकोच्या हातचं प्रोटिन शेक पिऊन पिऊन मृत्यूच्या दारात पोहोचला नवरा विद्यमान हवाई दल प्रमुख होतायत निवृत्त विद्यमान हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया हे या महिनाअखेर म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर एअर मार्शल चौधरी या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. चौधरी हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि संरक्षण सेवा स्टाफ कॉलेज, वेलिंगटनचे माजी विद्यार्थी आहेत. उप हवाई दल प्रमुख होण्यापूर्वी त्यांनी पश्चिमी वायूदलात एअर ऑफिसर कमांड-इन-चीफ या पदाची जबाबदारी सांभाळली होती.
  Published by:desk news
  First published: