मुंबई, 21 सप्टेंबर : हिरो भलीमोठी बाईक (Bike) आपल्या हातात उचलतो. व्हिलनशी फायटिंग करताना ज्या वस्तू प्रत्यक्षात उचलणं शक्य नाही त्या अगदी एका हातातही सहज उचलतो. एरवी फिल्ममध्ये आपण असे बरेच सीन पाहत आलो आहोत. असे सर्वच सीन खरे असतात असं नाही. प्रत्यक्षात कुणाला असं काही उचलणं शक्य नाही. पण रिअल लाइफमध्ये एका व्यक्तीनं ते करून दाखवलं आहे. डोक्यावर भलीमोठी बाईक (Motorcycle) घेणाऱ्या (Man carrying bike on head and climb on bus) रिअल बाहुबलीचा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भलीमोठी बाईक आपल्या डोक्यावर घेतली आहे. इतकंच नव्हे कर तर तो ती बाईक घेऊन बसवरही चढला आहे. महत्त्वाचं म्हणजे बाईक बसवर चढवताना त्याने बिलकुल ती हाताने धरली नाही आहे, तर फक्त डोक्यावर ठेवली आहे.
वाह क्या BALANCE है 👌👌👌#HINDUSTANI जुगाड़ again😊😊😊😊 pic.twitter.com/cVxYKvNXnT
— Rupin Sharma IPS (@rupin1992) September 21, 2021
आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहून आपला स्वतःच्या डोळ्यावरही विश्वास बसणार नाही. हे वाचा - अरे बापरे! केस पेटत होते तरी ती काम करत राहिली आणि…; पाहा धक्कादायक VIDEO सुरुवातीला काही लोक या व्यक्तीच्या डोक्यावर बाईक देतात. सुरुवातीला बसच्या जिन्यावर पाय ठेवताना फक्त ही व्यक्ती बाईक आपल्या हातात धरते. त्यानंतर मात्र बाईकला लावलेला आपले दोन्ही हात सोडते आणि त्या हातांनी जिना धरते. बाईकच तशीच डोक्यावर असते. हात न लावता ही व्यक्ती एवढी जड बाईक एकदम सुरक्षितपणे बसच्या टपावर चढवते. असं करताना ना त्याचा हात किंवा ना त्याचा पाय थरथरतो आहे. अगदी एखादी साधी सायकल उचलावी तसं त्यानं त्या बाईकला उचलल्याचं दिसतं आहे. जसा हंडा डोक्यावर ठेवावं अशीच त्याने बाईक आपल्या डोक्यावर ठेवली आहे. हे वाचा - इतकं गाढ झोपलं पिल्लू की हलवूनही उठेना; हत्तीणीने काय केलं पाहा VIDEO हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सही शॉक झालेत. यावर बऱ्याच प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काही जणांनी त्याला बाहुबली म्हटलं आहे तर काही जणांनी तर बाहुबलीही याच्यासमोर फेल आहे, अशी कमेंट केली आहे. याआधीही अशाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका व्यक्तीने अशीच बाईक बसच्या टपावर चढवली होती.
या व्यक्तीची त्याची शरीरयष्टीही फिल्ममधील हिरोप्रमाणे पिळदार नाही. सामान्यच शरीरयष्टीचा तो आहे. तरीदेखील त्यानं डोक्यावर बाईक घेऊन दाखवली. बाईक घेऊन तो थांबला नाही तर त्या बाईकसह तो बसच्या शिडीवर जढला आणि बसच्या टपापर्यंत त्यानं बाईक पोहोचवली. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सही शॉक झालेत. यावर बऱ्याच प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. प्रत्येक जण या व्यक्तीचं कौतुक करत आहे. कुणी त्याला बाहुबली तर कुणी त्याला शक्तिमान म्हटलं आहे. तर एका युझरनं रिकामी उपाशी पोट असं सर्वकाही करून घेतो, असं म्हटलं आहे.