जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sharad Pawar Eknath Shinde : द्राक्षे गोड की आंबट ठरणार! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार सत्तांतरानंतर येणार एकाच मंचावर

Sharad Pawar Eknath Shinde : द्राक्षे गोड की आंबट ठरणार! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार सत्तांतरानंतर येणार एकाच मंचावर

  'सरकारने घोषणा केली भूविकास बॅंकेच कर्ज माफ करू आता गंमत बघा 10 वर्षांत कुणाल भूविकास बॅंकेचं कर्ज मिळालं का?

'सरकारने घोषणा केली भूविकास बॅंकेच कर्ज माफ करू आता गंमत बघा 10 वर्षांत कुणाल भूविकास बॅंकेचं कर्ज मिळालं का?

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंच्यावर पहिल्यांदा येणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 27 ऑगस्ट : महाविकास आघाडीकरून सत्ता स्थापन करण्यात महत्वाचा वाटा असलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्या पुण्यात असणार आहेत. दरम्यान त्यांच्यासोबत शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही असणार आहेत. (Sharad Pawar Eknath Shinde) महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंच्यावर पहिल्यांदा येणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा वार्षिक मेळावा उद्या (ता. 28) पुण्यात होत आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत तीनदिवसीय द्राक्ष परिषद होत आहे.

जाहिरात

पुणे-मुंबई महामार्गावर वाकड येथील पुलाजवळच्या टीपटॉप इंटरनॅशनल येथे सकाळी 11 वाजता संघाच्या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी शरद पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशु पाठक व ‘अपेडा’चे अध्यक्ष डॉ. एम.अंगमधु उपस्थित राहणार आहेत दरम्यान द्राक्षे परिषदेतील भाषणावेळी राजकीय शब्द फेकीत काहींना द्राक्षे गोड लागणार तर काहींना आंबट लागण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :  ‘खोके हराम’ नावाची संघटना, शिवसेनेनं शिंदे गटाचं केलं नामकरण, वाद चिघळणार!

दरम्यान बागाईतदार संघाचे कोशाध्यक्ष सुनील पवार म्हणाले, कोरानामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर संघाचा प्रत्यक्ष मेळावा होत आहे. त्यामुळे राज्यभरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. या निमित्ताने होत असलेल्या द्राक्ष परिषदेत यंदा देशी व निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाबरोबरच प्रक्रिया वाइन, बेदाणा या विषयांवर देशविदेशातील नामांकित शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळेल. परिषदेच्या तांत्रिक परिसंवादात विदेशी द्राक्ष अभ्यासक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, प्रयोगशील बागाईतदार तसेच द्राक्ष प्रक्रिया उद्योगातील तज्ज्ञ सहभागी होत आहेत.

जाहिरात

हे ही वाचा :   Bus Bai Bus: खड्डेमुक्त मुंबई शक्य आहे का?; पाहा काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर

मेळावा व प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा आढावा गेल्या काही दिवसांपासून संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, कोषाध्यक्ष सुनील पवार व मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे यांच्याकडून घेतला जात आहे. परिषदेचे तीन दिवसांचे शुल्क शेतकऱ्यांसाठी एक हजार रुपये आहे. परिषदेतील तांत्रिक कामकाज समाप्त होताच मंगळवारी (ता. 30) त्याच ठिकाणी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात