छत्रपती संभाजीनगर, 2 एप्रिल : आज छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. तर दुसरीकडे शिंदे, फडणवीस सरकार आजपासून आपल्या सावरकर गौरव यात्रेला सुरुवात करणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत, मात्र दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दोन बड्या नेत्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला सोबत हजेरी लावल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
मॅरेथॉन स्पर्धेला हजेरी
कर्णपूरा मैदानात अहिंसा रन मॅरेथॉन स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदीपान भूमरे तसेच ठाकरे गटाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी एकत्र हजेरी लावली. एवढच नाही तर ते एकाच व्यासपीठावर शेजारी बसून हसत हसत चर्चा करताना दिसून आले. त्यामुळे आता त्यांच्यामध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली असावी असा प्रश्न उपस्थित होत असून चर्चेला उधाण आलं आहे.
संजय शिससाटांचं वक्तव्य चर्चेत
दरम्यान काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मला फोन आला होता, कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं असा दावा केला होता. त्यामुळे आता संदीपान भुमरे आणि अंबादास दानवे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे पुन्हा एकदा संजय शिरसाट यांचं ते व्यक्तव्य चर्चेत आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, NCP, Shiv sena, Uddhav Thackeray