Home /News /maharashtra /

चंद्रपूरमध्ये वाळू तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई, दहा ट्रॅक्टर जप्त, सर्वांविरोधात गुन्हे दाखल

चंद्रपूरमध्ये वाळू तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई, दहा ट्रॅक्टर जप्त, सर्वांविरोधात गुन्हे दाखल

Chandrapur Action against sand smugglers शनिवारी रात्री पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या भिमनी घाटातून अवैधरित्या वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी भिमनी घाटावरून वाळूतस्करी करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना पथकाला दिल्या.

पुढे वाचा ...
चंद्रपूर, 24 मे : चंद्रपूर जिल्ह्यातील वाळूघाटातून वाळूची तस्करी (Sand smuggler) करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी मोठी (Police Action) कारवाई केली आहे. या वाळूचे दहा ट्रॅक्टर जप्त करण्यात (10 Tractor seized) आले असून दहा जणांच्या विरोधात गुन्हेदेखिल दाखल करण्यात आले आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी (Sand Smuggling) होत असल्याच्या तक्रारी पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला अवैध वाळूतस्करांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (वाचा-सुशील कुमारची चौकशी सुरू असताना, रोहतकमध्ये आणखी एका पहिलवानाची हत्या) पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेनं अवैध वाळूतस्करांवर पाळत ठेवण्यासाठी एक पथक स्थापन केलं आहे. या पथकला शनिवारी रात्री पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या भिमनी घाटातून अवैधरित्या वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी भिमनी घाटावरून वाळूतस्करी करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना पथकाला दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भिमणी घाटावर धडकले. यावेळी घाटातून वाळूचा उपसा करताना दहा ट्रॅक्टर आढळून आले. (वाचा-Mumbai : दंड कमी करण्यासाठी 30 हजारांची लाच मागणारा अटकेत, CBI ची कारवाई) वाळूचा उपसा करत असलेल्या दहा ट्रॅक्टरपैकी कुणाकडेही कागदपत्रे नसल्याचं तपासणीत समोर आलं. त्यानंतर पथकानं हे सर्व दहा ट्रॅक्टर जप्त केले. तसंच विनय आलाम, तुषाल पिंपपळकर, सचिन गौरकार, विजय आत्राम, रोशन नरसपुरे, स्वप्नील पिंपपळशेंडे, गोपीनाथ सिडाम, पुरुषोत्तम पिदूरकर, दीपक शुभ्रत्कर, राजू गोंधळी, या वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अतल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, खनके, साळवे, भुजाडे, बल्की, गोहोकार, जांभुळे, डांगे, जमीर, मोहुर्ले यांच्या पथकानं कारवाई केली.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Chandrapur, Police, Police action, Sand mafiya

पुढील बातम्या