मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Sagar Dhankhad प्रकरणी सुशील कुमारची चौकशी सुरू असताना, रोहतकमध्ये आणखी एका पहिलवानाची निर्घृण हत्या

Sagar Dhankhad प्रकरणी सुशील कुमारची चौकशी सुरू असताना, रोहतकमध्ये आणखी एका पहिलवानाची निर्घृण हत्या

Rohtak wrestler murder ज्युनियर पहिलवान असलेला सागर धनखड हादेखिल मूळचा रोहतक इथलाच होता. त्यामुळं रोहतकमध्ये झालेल्या पहिलवानाच्या हत्येच्या प्रकरणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • Published by:  News18 Desk

रोहतक, 24 मे : ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटू सुशील कुमारचं (Sushil Kumar) कुस्तीपटू सागर धनखड (Sagar Dhankhad) हत्या प्रकरण ताजं असतानाच रोहतकमध्ये (Rohtak) आणखी एका पहिलवानाची हत्या (Wrestler Murder) करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी शाळेच्या मैदानावर प्रॅक्टिस करत असलेल्या एका पहिलवानाची हत्या करण्यात आली. बाईकवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या घालत या पहिलवानाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. (wrestler shot dead in Rohtak)

(वाचा-Mumbai : दंड कमी करण्यासाठी 30 हजारांची लाच मागणारा अटकेत, CBI ची कारवाई)

या घटनेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार रोहतकच्या जनता कॉलनीमध्ये राहणारा हा पहिलवान सोमवारी सायंकाळी वैश्य स्कूलच्या मैदानावर प्रॅक्टिस करत होता. याठिकाणी तो व्यायाम करत असताना सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास बाईकवरून दोन तरुण याठिकाणी आले. त्या तरुणांनी मैदानावर व्यायाम करत असलेल्या पहिलवानावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात या पहिलवानाचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकारानंतर पोलिस घटनास्थली पोहोचले आणि माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे.

(वाचा -हृदयद्रावक! मुलाच्या दारुच्या बाटलीनं घेतला बापाचा जीव;90 वर्षीय वृद्धाचा मृत्यू)

सागर धनखड या पहिलवानाच्या हत्येचं प्रकरण ताज असतानाच आणखी एका पहिलवानाची गोळ्या घालून अशा प्रकारे हत्या झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यामागचं एक कारण म्हणजे ज्युनियर पहिलवान असलेला सागर धनखड हादेखिल मूळचा रोहत इथलाच होता. त्यामुळं रोहतकमध्ये झालेल्या पहिलवानाच्या हत्येच्या प्रकरणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दिल्लीमध्ये झालेल्या पहिलवान सागर धनखड हत्या प्रकरणी आता पोलिस तपासात नवनवीन बाबी समोर येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता पहिलवान सुशील कुमारला अटक केली आहे. त्यानंतर आता चौकशीतून विविध गोष्टींचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणातून इतरही काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. आता रोहतकमध्ये सोमवारी सायंकाळी झालेल्या हत्येचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचतात हे पाहावं लागणार आहे.

First published:

Tags: Crime news, Haryana, Murder