• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • Mumbai : दंडाची रक्कम कमी करण्यासाठी 30 हजारांची लाच मागणारा अटकेत, सरकारी कर्मचारीही CBI च्या रडारवर

Mumbai : दंडाची रक्कम कमी करण्यासाठी 30 हजारांची लाच मागणारा अटकेत, सरकारी कर्मचारीही CBI च्या रडारवर

CBI arrest man taking Bribe दंडाची रकक्म 1 लाख 80 हजारांहून 40 हजारांवर आणण्यासाठी या व्यक्तीने सरकारी कर्मचाऱ्याकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली होती.

 • Share this:
  मुंबई, 24 मे : दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी लाच (Bribe) स्वीकारणाऱ्या एका व्यक्तीसह एका सरकारी कर्मचाऱ्याला (Public Servant) सीबीआयनं सोमवारी अटक केली. सरकारी क्वार्टरमध्ये पोटभाडेकरू (Sublet govt quarter) ठेवला म्हणून लावण्यात आलेली दंडाची रक्कम (Fine Amout) कमी करून देण्यासाठी या व्यक्तीनं 30 हजारांची लाच मागितली होती. ती स्वीकारताना या व्यक्तीला सीबीआयनं रंगेहात अटक केली. या व्यक्तीसह सरकारी कर्मचाऱ्याच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वाचा-पोलीस हो तुमच्यासाठी! कोरोना योद्धांसाठी सरसावले मराठी सेलिब्रिटी) या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारकर्ता हा एक सरकारी कर्मचारी आहे. त्याला सरकारच्या वतीनं मुंबईच्या घाटकोपर पश्चिममधील सीजीएस कॉलनी इथं 2014 मध्ये राहण्यासाठी क्वार्टर मिळालं होतं. पण या सरकारी कर्मचाऱ्यानं त्या क्वार्टरमध्ये पोटभाडेकरू ठेवल्याचं समोर आलं. ऑक्टोबर 2019 मध्ये या सरकारी कर्मचाऱ्याने क्वार्टर दुसऱ्याला भाडे तत्वावर दिल्याचं समोर आलं. त्यांनंतर या सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली. क्वार्टर भाड्याने दिल्या प्रकरणी तब्बल 1 लाख 82 हजार 604 रुपयांचा दंड या व्यक्तीला ठोठावण्यात आला. (वाचा-पुण्यात सोमवारी अवघे 494 कोरोनाबाधित!, सलग 5 दिवस रुग्णसंख्या घटण्याचा ट्रेंड) पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीनं या व्यक्तीला त्याची दंडाची रक्कम तो कमी करून देऊ शकतो असं सांगितलं. दंडाची रकक्म 1 लाख 80 हजारांहून 40 हजारांवर आणण्यासाठी या व्यक्तीने सरकारी कर्मचाऱ्याकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणाशी संबधित एका अधिकाऱ्याच्या मार्फत हे काम करून देण्याचं आश्वासन या व्यक्तीनं दिलं होतं. त्यानंतर या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयनं सापळा रचला आणि लाच घेणाऱ्या या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणात काम करून देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याचा संबंध सध्या तपासला जात आहे. या प्रकरणानंतर आरोपीच्या घराची तपासणी सीबीआयनं केली. त्यावेळी सीबीआयच्या हाती काही संशयास्पद कागदपत्रं लागल्याची माहितीही मिळाली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: