मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संजय राऊतच मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतात, चंद्रकांत पाटलांचा घणाघात

संजय राऊतच मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतात, चंद्रकांत पाटलांचा घणाघात

'जो समर्थ माणूस असतो, त्याला शत्रू जास्त असतात. भारतीय जनता पार्टी एकटी सर्वांना पुरून उरली आहे, त्यामुळे त्याचा थयथयाट अपेक्षित आहे'

'जो समर्थ माणूस असतो, त्याला शत्रू जास्त असतात. भारतीय जनता पार्टी एकटी सर्वांना पुरून उरली आहे, त्यामुळे त्याचा थयथयाट अपेक्षित आहे'

'जो समर्थ माणूस असतो, त्याला शत्रू जास्त असतात. भारतीय जनता पार्टी एकटी सर्वांना पुरून उरली आहे, त्यामुळे त्याचा थयथयाट अपेक्षित आहे'

  • Published by:  sachin Salve

कोल्हापूर, 27 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारला (mva government) वर्षपूर्ण झाले आहे. वर्षपूर्तीनिमित्ताने एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackrey ) यांनी मुलाखतीतून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. तर दुसरीकडे 'भारतीय जनता पार्टी एकटी सर्वाना पुरून उरली आहे, त्यामुळे त्याचा थयथयाट अपेक्षित आहे' अशी टीका भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी केली आहे.

कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. 'जो समर्थ माणूस असतो, त्याला शत्रू जास्त असतात. भारतीय जनता पार्टी एकटी सर्वांना पुरून उरली आहे, त्यामुळे त्याचा थयथयाट अपेक्षित आहे' अशी टीका पाटील यांनी केली.

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, 2 जवान शहीद

तसंच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेच मुख्यमंत्र्यांना दररोज वेगवेगळी विधानं करून अडचणीत आणत आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांना राऊत हेच जास्त प्रिय आहे.  सामना म्हणजे संजय राऊत, संजय राऊत म्हणजे सामना असं आहे का? हे उद्धव ठाकरे यांनीच स्पष्ट करावे, असा टोलाही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

भाजपचे हिंदुत्व हे दलालांचे आहे अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती, असे पत्रकारांनी विचारले असता पाटील म्हणाले की, 'सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य हिंदू हे जाणतो या देशांमध्ये हिंदूंचे जे रक्षण झालं ते 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर झाले आहे. संघाने ज्या प्रकारे हिंदू संघटित केला त्यातून हिंदू समाजाचे रक्षण झालं, त्यातून हिंदू एकत्रित झाले, ताकद निर्माण झाली आणि त्यांनतर वेगवेगळ्या प्रकारचे जातीय दंगे संपले. हिंदुत्व कोणाचे बेगडी आणि कोणाचे दलालांच आहे हे सर्वसामान्य हिंदूला जावून विचारा' असा टोला पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

दरम्यान, 'एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे 'महाराष्ट्रद्रोही' ठरविणार का?, असा सवाल भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला केला आहे.

बाप रे! चक्क इवल्याशा बेडकानं गिळला भलामोठा साप, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

फडणवीस यांनी एका पाठोपाठ तीन ट्वीट करून सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सोबतच काही सवालही केले आहे. 'आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे, याचा विसर या राज्य सरकारला पडला. पोलिस, फौजदारी कायदे हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, त्यांच्या छळवणुकीसाठी नाहीत, हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपली सदसदविवेक बुद्धी-संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का, हा प्रश्न निर्माण होतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

'सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशाप्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे, असंही टोलाही देवेंद्र फडवीस यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

First published:

Tags: Uddhav Thackery, उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील, शिवसेना