जाहिरात
मराठी बातम्या / देश / जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, 2 जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, 2 जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, 2 जवान शहीद

पाकिस्ताननं आज देखील सीमेपलीकडून गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. जवान-नायक प्रेम बहादुर खत्री आणि सुखबीर सिंह अशी या जवानांची नावं आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

राजौरी, 27 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरू झाला. या गोळीबाराला भारतीय सैन्य दलानं चोख प्रत्युत्तर दिलं. यादरम्यान सुरक्षा दलातील दोन जवान जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करेपर्यंत वीरमरण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या कुरापती वाढताना दिसत आहे. घुसखोरीचा प्रयत्न असो किंवा शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. पाकिस्ताननं आज देखील सीमेपलीकडून गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. जवान-नायक प्रेम बहादुर खत्री आणि सुखबीर सिंह अशी या जवानांची नावं आहेत.

जाहिरात

हे वाचा- भारतीय लष्कराच्या निशाण्यावर चीन; इस्रायल, अमेरिकेची घेणार मदत दरम्यान शुक्रवारी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर श्रीनगरमध्ये काही दहशतवाद्यांनी मिळून हल्ला केला होता. 26/11 घटनेला 12 वर्ष शुक्रवारी पूर्ण झाली असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या एका टीमवर गोळीबार केला. जम्मूच्या आयजींनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही दहशतवादी जैश ए मोहम्मदचे असून त्यापैकी दोन जण पाकिस्तानचे तर एक स्थानिक असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करून तीन दहशतवादी कारमधून फरार झाले. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात