मुंबई, 27 नोव्हेंबर : बेडूक आणि साप जरी शेतकऱ्याचे मित्र असले तरी एकमेकांचे वैरीच. शेतात आलेल्या किड्यांना बेडूक खातो आणि बेडकाला खाण्यासाठी साप येते. आतापर्यंत आपण सापाला बेडकाची शिकार करताना किंवा खातानाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण बेडकानं कधी सापाची शिकार केली आहे असं ऐकलं किंवा पाहिलं का? नाही ना? पण विश्वास बसणार नाही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की हिरव्या रंगाचा इवालासा बेडूक सापाची शिकार करतो आणि त्याला गिळताना दिसत आहे. साप आपले प्राण वाचवण्यासाठी तडफडतो आणि बेडकाला वेटोळं घालण्याचा प्रयत्न करतो मात्र बेडूक अगदी हुशारीनं या सापाची शिकार करतो आणि त्याला गट्टम करतो असं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
Frog swallows a snake🙄
— Susanta Nanda (@susantananda3) November 24, 2020
Everything is possible in food chain in the wild pic.twitter.com/yFJagDhUo5
Badla😂😂😂
— Ak MISHRA || (@odia_banker) November 24, 2020
Shocking video, frog stomach is big enough to hold a snack
— Frk (@Ma_Shaim) November 24, 2020
Unbelievable 🙃😱
— Sanjay B (@SanjayBirari) November 24, 2020
हे वाचा- बायकोच्या जाचाला कंटाळून सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी, ड्रायव्हर म्हणून करतोय काम IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या अन्नसाखळीत सगळं शक्य आहे. असं कॅप्शन देत सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. 23 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 305 हून अधिक रिट्वीट 74 हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तर बेडकानं हा बदला घेतला असल्याचं देखील उल्लेख केला आहे.

)







