Home /News /maharashtra /

मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही शब्द, अनवाणी पायानं बैलगाडा ओढत बळीराजानं काढली पदयात्रा!

मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही शब्द, अनवाणी पायानं बैलगाडा ओढत बळीराजानं काढली पदयात्रा!

बैलगाडीमध्ये प्रतिकात्मक बैलाचं पार्थिव घेऊन बळीराजा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान 'मातोश्री'वर धडक देणार

सांगली, 14 नोव्हेंबर: बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी एका शेतकऱ्यानं सांगली ते मुंबई बैलगाडी ओढत पदयात्रा काढली आहे. बैलगाडीमध्ये प्रतिकात्मक बैलाचं पार्थिव घेऊन हा बळीराजा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान 'मातोश्री'वर धडक देणार आहे. सामजिक कार्यकर्ते विजय जाधव (रा.इस्लामपूर, जि.सांगली) यांनी ही यात्रा काढली आहे. हिवाळी अधिवेशनात बैलगाडी शर्यतीला मंजुरी द्यावी, अशी मागणी जाधव यांच्याकडून करण्यात आली आहे. हेही वाचा...भाजप नेत्याच्या बहिणीनं आंदोलन करत साजरी केली 'काळी दिवाळी' राज्यातील ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीचं प्रचंड आकर्षण आहे. मात्र, मुंबई हायकोर्टानं 2011 मध्ये बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. त्यामुळे गावच्या जत्रांमध्ये तमाशा आणि कुस्तीच्या फडाबरोबर रंगणाऱ्या बैलगाडा शर्यती बंद झाल्या झाल्यानं नागरिक नाराज झाले आहे. बैलगाडीवरील शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी आतापर्यंत राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी वारंवार मागणी केली. मात्र, सरकारकडून या मागण्यांकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत आहे. या मागण्यांबाबत आता विजय जाधव यांनी थेट अनवाणी पायानं बैलगाडा ओढत सांगली ते मुंबई पदयात्रा काढली आहे. मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही शब्द.. उद्धव ठाकरे यांची 4 वर्षांपूर्वी भेट घेतलं होती. 'आमचे सरकार आल्यावर बैलगाडी शर्यतीला परवानगी देऊ', असा शब्द त्यांनी दिला होता. मात्र, राज्यात आता ठाकरे सरकार आलं आहे. तरी देखील उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी त्यांचा शब्द पाळावा, त्याची आठवण करून देण्यासाठी जाधव यांनी सांगली ते मुंबई बैलगाडी पदयात्रा दिवाळीच्या दिवशी सुरू केल्याचं विनायक जाधव यांनी सांगितलं. हेही वाचा..भाजपनेच सरकारचे डोळे उघडले.. नीतेश राणेंचा ठाकरे सरकारला खोचक टोला विनायक जाधव हे बैलगाड्यात बैलांची प्रतिकात्मक पार्थिव ठेऊन अंत्ययात्रा घेऊन मुंबईकडे दिवाळीच्या दिवशीच रवाना झाले आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात बैलगाडी शर्यतवरील बंदी उठवावी, अशी त्यांची मागणी आहे. येत्या 24 नोव्हेंबर रोजी जाधव हे मातोश्रीवर धडकणार आहेत, असंही विनायक यांनी सांगितलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, Sangli, Udhav thackeray

पुढील बातम्या