मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपनेच सरकारचे डोळे उघडले.. नीतेश राणेंचा ठाकरे सरकारला खोचक टोला

भाजपनेच सरकारचे डोळे उघडले.. नीतेश राणेंचा ठाकरे सरकारला खोचक टोला

भाजप नी सरकारचे डोळे उघडले.. म्हणुनच मंदिराचे दारे उघडले!!

भाजप नी सरकारचे डोळे उघडले.. म्हणुनच मंदिराचे दारे उघडले!!

भाजप नी सरकारचे डोळे उघडले.. म्हणुनच मंदिराचे दारे उघडले!!

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई, 14 नोव्हेंबर: पाडव्यापासून अर्थात सोमवार, 16 नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरांसह (Temple) सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांनी केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत असताना भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan rane) यांचे सुपुत्र आणि आमदार नीतेश राणे (MLA Nitesh Rane)  यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे.

मंदिर उघडण्याच्या निर्णयानंतर आमदार नीतेश राणे यांनी एक ट्वीट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा.. पाडव्यापासून मंदिरं उघडणार...पण मंदिरात प्रवेश करण्यासाठी 'या' नियमांची सक्ती

भाजपनी सरकारचे डोळे उघडले म्हणूनच मंदिराचे दारे उघडले, असं सांगत नीतेश राणे यांनी महाराष्ट्र भाजप (@BJP4Maharashtra), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (@ChDadaPatil) आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (@Dev_Fadnavis) यांचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात गेल्या आठ महिन्यांपासून लॉकडाऊन होता. परिणामी राज्यातील मंदिरंही बंद होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर 'मिशन बिगेन अगेन' अंतर्गत टप्प्या टप्प्यानं लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? असा सवाल करत राज्यातील मंदिरं खुली करावी, ही मागणी विरोधी पक्षानं लावून धरली होती. यावरून भाजपविरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा सामनाही रंगला होता.

मुख्यमंत्री Vs राज्यपाल

राज्यातील मंदिरं बंद असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रातून राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केला होता. यावरून उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना उत्तर दिलं होतं. हा वाद चांगलाच पेटला होता. या वादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सल्ला दिल्ला दिला आहे. कोश्यारी शब्द जपून वापरायला हवेत, असंही शहा यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा...दिवाळीच्या दिवशीच कोकणावर शोककळा, दापोलीच्या समुद्रात 3 तरुण बुडाले

काय म्हणाले होते कोश्यारी?

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपनं आंदोलन केल्यानंतर लगेचच राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. 'राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? असे प्रश्न कोश्यारी यांनी उपस्थित केले होते. कोश्यारी यांच्या राजकीय भाषेतील पत्रावरून प्रचंड वाद निर्माण झाला होता.

First published: