मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमरावतीत भाजप नेत्याच्या बहिणीनं आंदोलन करत साजरी केली 'काळी दिवाळी'

अमरावतीत भाजप नेत्याच्या बहिणीनं आंदोलन करत साजरी केली 'काळी दिवाळी'

कपाळावर काळी पट्टी बांधून सरकारचा तीव्र निषेध

कपाळावर काळी पट्टी बांधून सरकारचा तीव्र निषेध

कपाळावर काळी पट्टी बांधून सरकारचा तीव्र निषेध

अमरावती, 14 नोव्हेंबर: सगळीकडे दिवाळी उत्साहात साजरी होत असताना भाजपचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (BJP Leader Anil Bonde) यांच्या भगिणी संगीता शिंदे (Sangita Sinde)यांनी आंदोलन करत काळी दिवाळी साजरी केली. संगीता शिंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. विना अनुदानित शाळेच्या शिक्षकांना अजूनपर्यंत अनुदान मिळाले नाही. आज दिवाळी असूनही त्या शिक्षकांचे पगार झालेले नाही. त्यामुळे संगिता शिंदे यांनी कपाळावर काळी पट्टी बांधून सरकारचा तीव्र निषेध केला. सरकारच्या विरोधात घोषणा देत काळी दिवाळी साजरी केली. हेही वाचा...भाजपनेच सरकारचे डोळे उघडले.. नीतेश राणेंचा ठाकरे सरकारला खोचक टोला अमरावती शिक्षक मतदार संघाच्या अपक्ष उमेदवार संगीता शिंदे यांच्या नेतृत्वात विना अनुदानीत शिक्षकांनी आज, दिवाळीच्या दिवशी पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. संगिता शिंदे यांनी कपाळावर काळी पट्टी बांधून सरकारचा तीव्र निषेध केला. सरकारच्या व विरोधी घोषणा दिल्या. विना अनुदानित शाळेच्या शिक्षकांना अजूनपर्यंत अनुदान मिळाले नाही. आज दिवाळी असूनही त्या शिक्षकांचे पगार झालेले नाही. त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहे. या शिक्षकांच्या घरात दिवा लावू शकत नाही. त्यामुळे सर्व शिक्षकांनी आज आपली काळी दिवाळी साजरी करत सरकारचा निषेध व्यक्त केल्याचं संगीता शिंदे यांनी सांगितलं. भाऊ-बहिणीच्या नात्यात आडवा आला 'भाजप' आपल्या भावाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेल्या संगीता शिंदे व माजी आमदार अनिल बोंडे हे दोघेही गहीवरले. वडील व भावाचे पाय धुवून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली. यावेळी बहीण भावाचे अतूट प्रेम दिसून आलं. एकीकडे भाजप पक्ष तर दुसरीकडे बहीण असा पेच अनिल बोंडे यांच्या समोर निर्माण झाला आहे. मात्र, मी पक्षासाठी काम करेल, भाऊ म्हणून तिला पण आशीर्वाद दिला, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अनिल बोंडे त्यांनी यावेळी दिली. माझे भाऊ भाजपचे नेते आहेत. ते त्यांच्या पक्षाशी प्रामाणिक राहतील. पण मला लहान बहीण म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला आहे, असं मत अपक्ष उमेदवार संगीता शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. आता या निकडणुकीत भाजप नेते अनिल बोंडे आपल्या पक्षासाठी काम करतात की, बहिणीला दिलेला आशीर्वाद सार्थ ठरवतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अमरावतीत चौरंगी लढत..? कोरोना काळात महाराष्ट्रातील पहिल्या निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिक्षण संघर्ष समितीचे वतीने नेहमी चर्चेत असलेल्या संगीता शिंदे सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे अमरावती विभागात विद्यमान आमदार श्रीकांत देशमुख, नितीन धांडे, शेखर भोयर आणि संगीता शिंदे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून 1 डिसेंबर रोजी मतदान, तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. तर अमरावती शिक्षक मतदारसंघातील विद्यमान शिवसेना-भाजप युतीचे आमदार श्रीकांत देशपांडे यांना भाजपाचे संभाव्य उमेदवार नितीन धांडे यांच्याकडून तगडे आव्हान मिळणार आहे. हेही वाचा...पाडव्यापासून मंदिरं उघडणार...पण मंदिरात प्रवेश करण्यासाठी 'या' नियमांची सक्ती श्रीकांत देशपांडे यांना शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष अरुण शेळके यांच्याकडून आव्हान मिळाले होते. श्रीकांत देशपांडे यांनी अरुण शेळके यांचा पराभव करत विजय मिळवला होता. आता शिवसेना-भाजप वेगवेगळ्या निवडणुका लढवीत आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BJP, Maharashtra, Udhav thackeray

पुढील बातम्या