Home /News /maharashtra /

ही छोटीसी चूक पडू शकते खूप महागात, नजर ठेवायला येत आहे BMCचे 'स्पेशल 15'

ही छोटीसी चूक पडू शकते खूप महागात, नजर ठेवायला येत आहे BMCचे 'स्पेशल 15'

मुंबईसह राज्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

मुंबई, 14 सप्टेंबर: 'मास्क न वापरता घराबाहेर पडू नका. माझंच पाहा, माझ्याकडून नक्की काहीतरी चूक झाली असेल. म्हणून मला कोरोनाचा विळखा पडला. तुम्ही मात्र असं करू नका. कुठेही जा, बाजरात जा पण मास्क घाला. विनाकारण घराबाहेर पडू नका.', असं आवाहन मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट हॉस्पिटलच्या बेडवरून केलं आहे. त्यानंतर आता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. हेही वाचा...मानवतेला काळिमा, 10 रुपयांचं आमिष दाखवून 5 वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार मुंबईसह राज्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरी चिंताजनक गोष्ट समोर आली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण कमी होत असल्याचं स्पष्ट झाल्यानं चिंता वाढली आहे. त्यात मास्क वापरणं बंधनकारक असतानाही बहुतांश नागरिक मास्क वापरताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेनं आता एक भरारी पथकाची नियुक्त केली आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर हे पथक लक्ष ठेवणार आहे. मास्क लावला नसेल तर 200 रुपये दंड भरणं बंधनकारक असल्याचं आयुक्त सुरेश काकाणी यांनी माहिती दिली आहे. आयुक्तांनी सांगितलं की, मास्क न वापरणाऱ्यांवर कडक लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक वॉर्डात 15 जणांची टीम याप्रमाणे 24 वॉर्डात 360 जण मास्क न लावणाऱ्यांचा शोध घेतील. नाक आणि तोंडावर मास्क लावला नसेल तर त्या व्यक्तीकडून दंड वसूल करण्यात येईल. मात्र, दंड वसूल करणं हे ध्येय नाही, पण नागरिकांमध्ये मास्क वापरण्याबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे. दरम्यान, गणपतीनंतर आता मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांनाचा आकडा रोज वाढत आहे. आधी 1200 ते 1300 रुग्ण दररोज मुंबईत आढळत होते. मात्र, आता ही संख्या 2000 च्या पुढे गेली आहे. 'माझं कटुंब, माझी जबाबदारी' यासाठी 3500 टीम मुंबईकरांची तपासणी करणार आहेत. 3 जणांची एक टीम याप्रमाणे 10500 जण मुंबईकरांची तपासणी करणार आहे. मुंबईकरांनी कोणतीही माहिती लपवू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्याबरोबर सोसायटीत तपासणीसाठी येणाऱ्या टीमला सहकार्य करावं. अनेकदा काही सोसायटी टीमला प्रवेश देत नाहीत. आता उचभ्रू आणि मध्यम उच्चभ्रू वर्गात रुग्ण संख्या वाढत आहे. रुग्णांची वाढणारी संख्या पाहता बीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात ही काही बेड राखीव ठेवले जात आहे. हेही वाचा...ड्रग माफियांची माहिती न देता का परत गेली 'ड्रामेबाज नटी', सचिन सावंतांचा सवाल कोजागिरी असो, नवरात्र असो किंवा दिवाळी. आपले प्रत्येक सण हे भेटीशिवाय पूर्ण होत नाहीत, गरबा खेळालाच पाहिजे असं नाही. लोकांनी भेटताना मास्क लावावा आणि 3 फुटांच सुरक्षित अंतर बाळगावं, असंही आयुक्तांनी मुंबईकरांना आवाहन दिलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BMC, Corona, Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या