Home /News /maharashtra /

ड्रग माफियांची माहिती न देता का परत गेली 'ड्रामेबाज नटी', सचिन सावंतांचा सवाल

ड्रग माफियांची माहिती न देता का परत गेली 'ड्रामेबाज नटी', सचिन सावंतांचा सवाल

मुंबई व महाराष्ट्राला वाट्टेल ते बोलणारी ड्रामेबाज नटी मुंबईत येण्याआधी फारच फुशारक्या मारत होती.

    मुंबई, 14 सप्टेंबर: मुंबई व महाराष्ट्राला वाट्टेल ते बोलणारी ड्रामेबाज नटी मुंबईत येण्याआधी फारच फुशारक्या मारत होती. बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शन संदर्भात आपल्याकडे माहिती आहे, असेही ती तावातावाने सांगत होती. महाराष्ट्र सरकारला आव्हान देण्याची भाषा करत मुंबईत येऊन या नटीने तमाशाही केला परंतु ड्रग संदर्भातील कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांना न देताच परत का गेली, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत (Congress leader Sachin Savant) यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Bollywood Actress Kangana Ranaut) हिला उद्देशून केला आहे. हेही वाचा...रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेलं दुकान, अनिल परबांनी उडवली खिल्ली कंगणाचा समाचार घेताना सचिन सावंत म्हणाले, बॉलिवूडचे ड्रग माफीया कनेक्शन व त्यासंदर्भातील गुन्ह्यांची माहिती तिच्याकडे आहे, असं कंगणानं जाहीरपणे सांगितलं होतं. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबी याप्रकरणी चौकशी करत होती, त्यांच्याकडे कंगणाने ड्रग संदर्भातील माहिती देणे उचित होते, परंतु या नटीने कसलाही संदर्भ नसताना मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली. मुंबई पोलीस याचा त्यावेळी तपास करत नव्हते. कंगनाकडे बॉलिवूड व ड्रग कनेक्शनची जी माहिती आहे ती तिने एनसीबीकडे द्यावी, अशी आम्ही मागणीही केली होती. पण मुंबईत काही दिवस राहून कंगनानं ही माहिती दिली नाही, हे आश्चर्यकारक आहे. गुन्ह्याची माहिती दडवणे हे गुन्हाच.. एखाद्या गुन्ह्याची माहिती दडवणे हे भादंवि कलम 176 व 220 व एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा ठरते. नागरिक कर्तव्याचे ते हनन ठरते, याची कंगनाला माहिती असावी. तरीही ती माहिती न देता हिमाचल प्रदेशकडे परत गेली. यातून कंगना फक्त नौटकी करण्यात माहीर असून तेवढ्यासाठी मुंबईत येऊन तमाशा करुन परत गेली असे म्हणण्यास वाव आहे, असा टोलाही सचिन सावंत यांनी लगावला. कंगणाकडे ड्रग कनेक्शन संदर्भात असलेली माहिती ती देण्यास तयार आहे आणि ही माहिती दिली तर अनेकांचे पितळ उघडे पडेल, तसं तिनं म्हटलं होतं. या भीतीपोटीच कंगनाला वेगवेगळ्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याचे महाराष्ट्रातील भाजप नेते म्हणत होते. हेही वाचा...मानवतेला काळिमा, 10 रुपयांचं आमिष दाखवून 5 वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार महाराष्ट्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याबद्दल एकेरी भाषा तर तीने वापरलीच पण मुंबई पोलिसांना माफीया म्हणण्यापर्यंतही मजल गेली. तिच्याकडे जर काही माहिती आहे तर मुंबईत काही दिवस राहून कंगणाने तिच्याकडील ड्रग माफियांची माहिती का दिली नाही. या सर्व प्रकरणातून कंगणा ही भाजपाची कठपुतली असून महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या कटाचा ती भाग आहे, असा थेट आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Kangana ranaut

    पुढील बातम्या