Home /News /maharashtra /

मुंबईत मानवतेला काळिमा, 10 रुपयांचं आमिष दाखवून 5 वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार

मुंबईत मानवतेला काळिमा, 10 रुपयांचं आमिष दाखवून 5 वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार

10 रुपये देण्याचं आमिष दाखवून शेजारी राहाणाऱ्या 59 वर्षीय नराधमानं चिमुरडीच्या अब्रुचे लचके तोडले.

    मुंबई, 14 सप्टेंबर: ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर परिसरातील एका कोविड सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना अशाच एका घटनेनं मुंबई हादरली आहे. एका 5 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला आहे. 10 रुपये देण्याचं आमिष दाखवून शेजारी राहाणाऱ्या 59 वर्षीय नराधमानं चिमुरडीच्या अब्रुचे लचके तोडले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धारावीत ही मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. हेही वाचा...तब्बल 9 महिन्यांनंतर सुटला गुंता! बेपत्ता वैष्णवीबाबत धक्कादायक माहिती उजेडात मिळालेली माहिती अशी की, पीडित चिमुरडीनं या घटनेची माहिती आईला सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. मुलीच्या हातात 10 रुपयांची नोट होती. त्याबाबत आईनं तिला विश्वासात घेवून विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. पीडितेच्या आईने धारावी पोलिस स्टेशन गाठलं आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीची गंभीर दाखल घेत पोलिसांनी आरेपीला अटक केली आहे. 10 रुपये दिले आणि गप्प बसण्यास सांगितलं... नराधमानं पीडित मुलीला आपल्या बोलावून घेतलं. होतं. पीडित मुलीला 10 रुपये देवून नराधमानं तिच्यावर अत्याचार केला, असं पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती धारावी पोलिसांनी दिली आहे. कोविड सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार... दरम्यान, राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी ठिकठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु, ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये सोईसुविधा देण्याच्या नावाखाली एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली. ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी एका 27 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. या नराधमाने एका 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात हे कोविड सेंटर आहे. पीडित महिलेला आपल्या 10 महिन्याच्या मुलीसोबत एका खोलीत क्वारंटाइन करण्यात आले होते. याच सेंटरमध्ये तिच्या नात्यातील एक व्यक्तीला भेटायला गेली असता आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. आरोपी हा पीडित महिलेला गरम पाणी देण्याच्या बहाण्याने खोलीत येत होता. काही दिवसांनी या नराधमाने लहान मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन पीडितेवर अत्याचार केले. या आरोपीने जूनच्या पहिल्या आठवड्यात या आरोपीने तीन वेळी पीडितेवर अत्याचार केला होता, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत पाटील यांनी दिली. हेही वाचा...प्रेमीयुगुलाचा भयानक अंत! जन्मदात्यानं उद्ध्वस्त केला लेकी लेकीचा संसार आपल्या कुटुंबाची बदनामी होईल या भीतीपोटी पीडित महिलेनं तेव्हा तक्रार दाखल केली नव्हती. पण, अखेर संतापाचा उद्रेक झाल्यामुळे या महिलेनं शनिवारी नवघर पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Dharavi, Rape case

    पुढील बातम्या