पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! डिसेंबर, जानेवारीत आणखी वाढणार कोरोनाची आकडेवारी

पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! डिसेंबर, जानेवारीत आणखी वाढणार कोरोनाची आकडेवारी

पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र असलं तरी....

  • Share this:

पुणे, 10 ऑक्टोबर: पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र असलं तरी, डिसेंबर आणि जानेवारीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडेवारी आखणी वाढणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य पथकानं दिली आहे. त्यामुळे वर्षअखेर आणि नववर्षाची सुरूवात पुणेकरांसाठी काळजीची राहणार असल्याचं आता स्पष्ट आहे.

हेही वाचा...पुण्यात गोरखधंद्याचा पर्दाफाश, पती, पत्नीसह दीराविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे आरोग्य पथ सध्या पुण्यात आलं आहे. पुण्यातील जम्बो सेंटरसह कोरोनाबाधित क्षेत्राची पाहणी या आरोग्य पथकानं केली. कोरोनाची सद्यस्थिती, त्याचे परिणाम आणि वाढीची चिन्हे या अनुषंगाने महापालिकेला काही सूचनाही या पथकाकडून करण्यात आल्या आहेत. पुढील दीड महिना म्हणजेच नोव्हेंबर अखेरपर्यंत रुग्णसंख्या आणखी कमी होईल, असे पथकातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं आहे. परंतु, डिसेंबर आणि जानेवारीत मात्र कोरोनाचा संसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटीलेटर बेड्स सज्ज ठेवण्याच्या सूचना आरोग्य पथकानं दिल्या आहेत.

पुण्यातली दुकानेही आता रात्री 9 पर्यंत खुली राहणार

पुण्यात दुकानदारांना रात्री 9 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून तब्बल 30 हजार दुकानदारांना त्याचा फायदा होणार आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना व्यवसायासाठी रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी आहे पण दुकानदारांना मात्र अजूनही संध्याकाळी 7 वाजताच शटर डाऊन करावं लागत होतं त्यामुळे त्यांनीही वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. व्यापाऱ्यांनी पाठपुरावा केल्याने अखेर महापालिका प्रशासनाने हा नवा निर्णय जाहीर केला आहे.

पुण्यात एकूण 30 हजार दुकानं आहेत. काम संपवून लोक रात्री बाहेर निघतात आणि त्याच वेळेला दुकाने बंद करावी लागतात अशी अशी व्यापाऱ्यांची तक्रार होती. त्यामुळे आता दुकानेही रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सुधारीत वेळेचे आदेश जारी केले आहेत.

अनलॉकच्या प्रक्रियेनुसार आता सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे हॉटेल्स आणि बार सुरू करण्याला परवानगी दिली होती. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वे सेवा आता पूर्वपदावर येत आहे. पुणेकर आणि मुंबईकरांची लाडाची असलेली डेक्कन क्वीन पुन्हा एकदा रुळावर धावणार आहे. दोन दिवसांनी अर्थात 9 ऑक्टोबरपासून डेक्कन क्वीनसह पाच रेल्वे गाड्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा..मुंबई, पुणेसह कोल्हापूरला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं झोडपलं

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वे सेवा ठप्प होती. पण आता कोरोनाचा जोर ओसरत असल्यामुळे रस्ते वाहतुकीनंतर रेल्वे वाहतूक ही सुरू करण्यात येत आहे. 9 ऑक्टोबरपासून पुणे- मुंबई मार्गावरही रेल्वे गाड्या सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. एकूण 5 गाड्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे- मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, सोलापूर मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेस आणि मुंबई गोंदिया या विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 10, 2020, 5:52 PM IST

ताज्या बातम्या