पुण्यात गोरखधंद्याचा पर्दाफाश, पती, पत्नीसह दीराविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात गोरखधंद्याचा पर्दाफाश, पती, पत्नीसह दीराविरुद्ध गुन्हा दाखल

वॉकी-टॉकीच्या सहाय्यानं दारू विक्री करणाऱ्या पती, पत्नीसह दीराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल

  • Share this:

पुणे, 10 ऑक्टोवर: पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदा दारुविक्रीचा पर्दाफाश केला आहे. वॉकी-टॉकीच्या सहाय्यानं दारू विक्री करणाऱ्या पती, पत्नीसह दीराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

हेही वाचा...'बाबा, माझं अपहरण झालं, 10 लाख रुपये मागितले' मुलाच्या फोनमुळे घडले नाट्य, आणि..

नीलेश बबन काळे, संतोष काळे आणि नीता काळे अशी आरोपींची नावं आहे. तिन्ही आरोपींकडून 1 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. मंचर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यतील आंबेगाव तालुक्यातील मौजे भावडी येथील हॉटेल मनोरंजनमध्ये नीलेश काळे व संतोष काळे हे दोन सख्खे भाऊ वॉकी-टॉकीचा वापर करून बेकायदा दारू विक्री करत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथक व मंचर पोलिसांनी हॉटेल मनोरंजन येथे छापा टाकला. त्यावेळी नीलेश काळे हा मागील दरवाजातून पळून गेला. हॉटेलची झडती घेतली असता, काउंटरजवळ देशी-विदेशी दारू आढळून आली.

हेही वाचा...राकेश रोशन यांच्यावर गोळीबार प्रकरणातील कुख्यात गँगस्टरला अखेर अटक

पोलिसांनी रुमचे कुलप तोडून तपासणी केली असता रूममधील संडास व बाथरूममध्ये देशी-विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी सुमारे 1 लाख 69 हजार 910 रुपयांची देशी-विदेशी दारू व चार हजार रुपयांच्या दोन वॉकी टॉकी असा एकूण 1 लाख 73 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 10, 2020, 5:24 PM IST

ताज्या बातम्या