मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING NEWS: शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि अमित शहांची झाली गुप्त बैठक?

BREAKING NEWS: शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि अमित शहांची झाली गुप्त बैठक?

राज्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर अनेक आरोप झाले आहे. त्यातच मुंबईत स्फोटकांनी कार ...

राज्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर अनेक आरोप झाले आहे. त्यातच मुंबईत स्फोटकांनी कार ...

राज्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर अनेक आरोप झाले आहे. त्यातच मुंबईत स्फोटकांनी कार ...

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 28 मार्च :  मुंबईमध्ये स्फोटकांनी गाडी प्रकरण, सचिन वाझे (Sachin Vaze) अटक, मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren case) आणि परमबीर सिंग (Parambir Singh) पत्रामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government) चिंतातूर वातावरण आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक जागरण या हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शरद पवार यांची भेट अहमदाबादमध्ये झाली. शरद पवार हे राजस्थानमधील जयपूरमध्ये एका कार्यक्रमाला गेले होते. त्याच्या एकदिवसाआधी ते अहमदाबादला आले होते. तेव्हा ही बैठक झाल्याचे वृत्त आहे. शरद पवार हे एका खासगी विमानाने अहमदाबादला पोहोचले होते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह एका उद्योगपतीच्या गेस्ट हाऊसवर ही भेट झाली. परंतु, या बैठकीला शरद पवार खरंच हजर होते का, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप मिळू शकली नाही.

VIDEO: फिल्मफेअर अवॉर्ड न मिळाल्याने सोनाक्षी निराश; जुगाड करत घरी आणला पुरस्कार

गुजरातमध्ये राजकीय बदल केले जाणार असल्याची चर्चा आहे. त्या दृष्टीने या बैठकीला मोठे महत्त्वप्राप्त झाले होते. तसंच या भेटीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, अहमदाबादमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांची अशी कोणतीही भेट झाली नाही. ही केवळ अफवा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; या वाहनांवर आकारला जाणार Green Tax

राज्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर अनेक आरोप झाले आहे. त्यातच मुंबईत स्फोटकांनी कार सापडल्याप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए करत आहे. तर खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या होत्या. त्यामुळे अशी काही भेट झाली आहे का, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे.

First published:

Tags: BJP, Hiren mansukh, NCP, Paramvir sing, Sachin vaze, अमित शहा, शरद पवार