मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: फिल्मफेअर अवॉर्ड न मिळाल्याने सोनाक्षी झाली निराश; जुगाड करत घरी आणला पुरस्कार

VIDEO: फिल्मफेअर अवॉर्ड न मिळाल्याने सोनाक्षी झाली निराश; जुगाड करत घरी आणला पुरस्कार

शनिवारी रात्री उशिरा फिल्मफेअर अवॉर्डची (Filmfare Award) घोषणा करण्यात आली आहे. अशात बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला (Sonakshi Sinha) कोणताही पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे ती निराश झाली आहे. पण तिने हार मानली नाही. स्वत: जुगाड करत फिल्मफेअर अवॉर्ड घरी आणला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 28 मार्च: फिल्मफेअर अवॉर्ड (Filmfare Award) बॉलिवूडचा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. नुकतीच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेता इरफान खानला (Irfan Khan) 'इंग्लिश मीडियम' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आलं. तर तापसी पन्नूला (Taapsee Pannu) 'थप्पड'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. अशात बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला (Sonakshi Sinha) कोणताही पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे ती निराश झाली आहे. पण तिने हार मानली नाही. स्वत: जुगाड करत फिल्मफेअर अवॉर्ड घरी आणला आहे.

सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या सोनाक्षी सिन्हाने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये ती फिल्मफेअर अवॉर्डचा स्केच बनवताना दिसत आहे, तर बॅकग्राऊंडला किशोर कुमार यांचं 'मेरे सपनों की राणी' या गाण्याचं संगित वाजत आहे. चित्र पूर्ण झाल्यानंतर तिने या चित्राला किसही केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षीने लिहिलं कि, 'फिल्मफेअरपर्यंत तर पोहोचता आलं नाही, परंतु फिल्मफेअर माझ्यापर्यंत पोहोचला'.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकं तिच्या चित्रकलेचंही कौतुक करत आहेत. सोनाक्षीच्या या व्हिडीओला चाहत्यांची चांगली पसंतीही मिळते आहे.

(वाचा -Filmfare Awards 2021 LIVE: गुलाबो सिताबोला बेस्ट डायलॉग्जचा पुरस्कार)

खरंतर बॉलिवूडमधील प्रत्येकजण फिल्मफेअर पुरस्काराची आतुरतेनं वाट पाहत असतात. यावर्षी 66 वा फिल्मफेअर पुरस्कार शनिवारी उशिरा जाहीर करण्यात आला आहे. दिवंगत अभिनेता इरफान खानने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारवर आपली मोहोर उमटवली आहे. तर तापसीला 'थप्पड' या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर पटौदी घराण्याचे नवाब अर्थात सैफ अली खानला बेस्ट सपोर्टींग रोलसाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे.

First published:
top videos

    Tags: Actress, Bollywood, Bollywood News, Social media viral, Sonakshi sinha, Star celebraties, Taapsee Pannu