वसई, 28 सप्टेंबर : वसईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. वसईच्या वाकीपाडा येथील इंडूजा कंपनीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या स्फोटात तीन ते चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित घटना ही आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वसई महापालिकेचे अग्निशन दलाचे पथक घटनास्थल दाखल झाले आहे. वाकीपाडा येथे झालेला स्फोट हा खूप मोठा होता. या स्फोटामुळे परिसराला मोठा हादरा बसला होता. हा स्फोट इतका भयानक होता की एक किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचा आवाज गेला. या आवाजामुळे परिसरातील नागरीक भयभीत झाले होते. नेमकं काय घडलं ते कुणाच्याच लक्षात येत नव्हतं. सुरुवातील आग लागल्याचं बोललं जात होतं. नंतर कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याचं उघड झालं.
वसईच्या वाकीपाडा येथील इंडूजा कंपनीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या स्फोटात तीन ते चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. #Vasai #fire #boilerblast pic.twitter.com/FHgc6EkdtQ
— News18Lokmat (@News18lokmat) September 28, 2022
( कोल्हापूर हादरले! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलांचा बापाने केला खून ) वाकीपाडा येथील इंडूजा कंपनीत स्फोट झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. स्फोटानंतर धुराचे मोठमोठे लोळ आकाशात जाताना दिसत होते. स्फोटानंतर तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच घटनास्थळी अग्निशन दलाचे जवान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करतील.