मुंबई, 11 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) असते तर आज चित्र वेगळं असतं, असं विधान करुन राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडवून देणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना शिवसेना (Shiv Sena) नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना नेत्या आणि विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी याआधी यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिलं होतं. पण त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी दिलेलं प्रत्युत्तर हे सडेतोड आहे. “आपल्याला पहिल्यांदा मंत्रीपद मिळालं आहे, त्यामुळे नीट काम करा”, असा सल्लाच पेडणेकरांनी यशोमती ठाकूर यांना दिला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या या सल्ल्यावर यशोमती ठाकूर काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या? “यशोमती ठाकूर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. शरद पवार स्वत: महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महर्षी म्हणून काम करत आहेत. यशोमती ठाकुरांनी असे वादाचे मुद्दे तयार करु नयेत. तुमचं असंच म्हणणं जर असेल तर या मंत्रीमंडळात तुम्ही मंत्री राहील्या नसत्या. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा मंत्रीपद मिळालंय तर नीट काम करा”, अशी रोखठोक प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. नेमकं प्रकरण काय? अमरावतीत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला यशोमती ठाकूर यांच्यासह शरद पवार, राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार, खासदार नवनीत राणा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना यशोमती ठाकूर यांनी शरद पवार आज मुख्यमंत्री असते तर राज्यातील सध्याचं चित्र वेगळं असतं, अशा प्रकारचं विधान केलं.
पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही @PawarSpeaks @bb_thorat @OfficeofUT @AjitPawarSpeaks pic.twitter.com/NE79YEJQZc
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) April 10, 2022
( राज ठाकरेंनी बोलावलेली बैठक संपली, आता निर्णय वसंत मोरेंवर! ) यशोमती ठाकूर यांच्या अशाप्रकारच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या बातम्या प्रत्येक आठवडा, पंधरा दिवस किंवा महिन्याभरात समोर येतात. या अशा धुसफुसींच्या बातम्यांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये विविध चर्चांना उधाण येतं. राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये वारंवार मतभेदाच्या बातम्या समोर येत आहेत. महाविकास आघाडीत कधी काँग्रेस नाराज असते, तर कधी निधी मिळत नसल्याने शिवसेनेचे प्रतिनिधी नाराज असतात, विशेष म्हणजे पारनेरच्या सात नगरसेवकांच्या मुद्द्यावरुन स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होते, असं चित्र बघायला मिळालं होतं. ( KL राहुल पहिल्याच बॉलवर क्लिन बोल्ड होताच गर्लफ्रेंड आथियाची अशी होती रिअॅक्शन ) दुसरीकडे शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अनपेक्षितपणे केलेलं हिंसक आंदोलन, त्यानंतर यशोमती ठाकुरांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भर कार्यक्रमात केलेलं विधान या सगळ्या घडामोडी पाहता महाराष्ट्रातील राजकारण नेमकं कोणत्या दिशेला जातंय, याचा अंदाज बांधणं हे आजच्या घडीला कठीण असल्याचं चित्र आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या कार्यकाळात आणखी काय-काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

)








