मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शरद पवारांनी तेढ निर्माण करू नये, 'सिल्व्हर ओक'वर 50000 पोस्टकार्ड पाठवणार

शरद पवारांनी तेढ निर्माण करू नये, 'सिल्व्हर ओक'वर 50000 पोस्टकार्ड पाठवणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राम जन्मभूमीचे उद्घाटनासंदर्भात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात आंदोलन करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राम जन्मभूमीचे उद्घाटनासंदर्भात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात आंदोलन करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राम जन्मभूमीचे उद्घाटनासंदर्भात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात आंदोलन करण्यात येत आहे.

बीड, 22 जुलै: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राम जन्मभूमीचे उद्घाटनासंदर्भात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. बीड येथेही आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. 'जय श्री राम' असं लिहिलेले सुमारे 50 हजार पोस्टकार्ड शरद पवार यांचा मुंबईतील बंगला 'सिल्व्हर ओक'वर पाठवण्यात येणार आहेत.

हेही वाचा...शरद पवार खासदारकीची शपथ घेत असताना त्यांच्याविरोधात नाशिकमध्ये घोषणाबाजी

परळी येथे बुधवारी शरद पवार यांच्याविरुद्ध अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांच्या वक्तव्याचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी परळीत पोस्ट ऑफिससमोर निदर्शने करत 'जय श्री राम' नावाचे 5 हजार पोस्ट कार्ड पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर पाठवण्यात आले.

त्याचबरोबर बीड जिल्ह्यासह संबंध भारतातून शरदचंद्र पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर 50 हजार पोस्ट कार्ड पाठवण्यात येणार आहेत, असं भाजप युवक जिल्हा अध्यक्ष अरुण पाठक, शाम गित्ते यांनी सांगितलं आहे. प्रभू श्रीराम यांच्याबाबत बोलून शरद पवारांनी समाजात तेढ निर्माण करू नये, असंही अरूण पाठक यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार... ?

अयोध्येतल्या ऐतिहासिक राम मंदिराचं भूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमीपूजन केलं जाणार आहे. पंतप्रधानांनी राम मंदिर ट्रस्टचं निमंत्रण स्विकारलं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राम मंदिर भूमीपूजनाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर खोचक टीका केली होती.

कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवी. मात्र, काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल, अशा शब्दांत शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. आम्हालाही वाटत की कोरोना संपवला पाहिजे. पण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत. ते दिल्लीत जाऊन या मुद्द्यावर प्रश्न मांडतील, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा...भाजपच्या आमदाराला कोरोनाची लागण, स्वत: सोशल मीडियावर पोस्ट केला मेसेज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांना पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या प्रश्नाला उत्तर देतांना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली होती.

First published:

Tags: BJP, PM narendra modi, Ram mandir and babri masjid, Ram mandir ayodhya