चांदवड, 22 जुलै: मुंबई, पुण्यात कोरोनानं थैमान घातलं असताना नाशिक जिल्ह्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत आहे. त्यात चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी स्वत: सोशल मीडियावर मेसेज पोस्ट करून माहिती दिली आहे.
हेही वाचा...कडक सॅल्यूट! त्याचा 'काळ' आला होता पण पुणे पोलिसांनी येऊ दिली नाही 'वेळ'
'थोडी शंका आली होती म्हणून काल कोरोना तपासणी केली, दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होईल आणि आपल्या सेवेत तत्पर होईल. तरी गेल्या 7-8 दिवसांत माझ्यावर प्रेम करणारी जी लोक माझ्या संपर्कात आली त्यानां माझी विनंती आहे की, आपण सर्वानी काळजी घ्यावी. तसेच आपणास काही त्रास होत असल्यास डॉक्टरांना भेटून तपासणी करुन घ्यावी, अशी विनंती देखील आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यातल्या उद्धव ठाकरे सरकारमधले आणखी एक राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सत्तार यांनीच ही माहिती दिली आहे. सत्तार यांना कोरोनाची काही लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांनी आपली टेस्ट करून घेतली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने ते आता होम क्वारंटाइन झाले आहेत. काळजीचं कारण नाही. प्रकृती चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनीच आपली चाचणी करून घ्यावी असं आवाहनही सत्तार यांनी केलं आहे.
कोरोनाच्या काळात मदत कार्यासाठी बाहेर जाणं होतं आहे. त्यावेळी कोरोनाची बाधा झाली असेल.परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी व योग्य ते उपचार घेऊन ‘होम क्वारंटाइन’ व्हावं असं आवाहनही अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
हेही वाचा... विनामास्क फिरणाऱ्यांना पत्रकारानं असा शिकवला धडा, VIDEO पाहून आवरणार नाही हसू
दरम्यान, या आधीही काही मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली होती. ते सर्व मंत्री त्यातून बरे होऊन पुन्हा आपल्या कामाला लागले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.