सातारा, 29 नोव्हेंबर: मराठा समाजाचं आरक्षण (Maratha Reservation) स्थगित होण्यास सगळेच जबाबदार आहेत. कुणाचं नाव घेऊन मी कुणाला मोठं करणार नाही. ही लोक मोठी नाहीत, केवळ वयानं मोठी झाली आहेत, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udayanraje Bhosale) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना टोला लगावला.
लोकांनी यांना मान सन्मान दिला, निवडून दिलं. हीच लोक वेळ आली तर खाली खेचतात. लोकं यांना रस्त्यावर येऊ देणार नाही, घरात जाऊन जाब विचारतील, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. मराठ्यांचा उद्रेक घडला तर त्याला हीच लोकं जबाबदार राहातील, असा इशारा देखील यावेशी त्यांनी दिला.
हेही वाचा... ज्यांनी मराठा समाजावर अन्याय केला तेच सत्तेत बसले, उदयनराजेंचा सरकारवर प्रहार
खासदार उदयनराजे पत्रकारांनी संबोधित करताना म्हणाले की, 'मला समजत नाही, की शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. सर्वधर्म समभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचं काम अनेक वर्षांपासून झालं आहे. मी मराठा म्हणून जन्माला आलो असलो तरी मराठा म्हणून बोलत नाही. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊन, प्रत्येक समाजाला न्याय मिळायला हवा या भूमिकेतून आज मुद्दे मांडणार आहे. किती दिवस मराठा समाजाचा अंत पाहणार आहात. मंडल आयोगावेळी मराठा समाजाचा विचारा का केला नाही?' असा सवाल देखील उदयनराजेंनी उपस्थित केला.
आता कुबट वास यायला लागला आहे. छत्रपतींचे नाव घ्यायचे आणि राजकीय दृष्टिकोन ठेवायचा आणि एखाद्या समाजाला दाबायच काम केलं जात आहे. आधीच्या पीढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला, असं ते म्हणाले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी केवळं होणार, झालं असं आश्वासन दिलं जातं. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. प्रश्न सोडवता येत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा, अशा शब्दात त्यांनी आरोप केला आहे.
हेही वाचा...'विधानसभेत उलटा टांगेन', बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱ्याला झापले
जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. इतर समाजावर अन्याय झाला तरी त्यांचीही बाजू मांडत आलेलो आहे. इतर समाजाच्या लोकांनी गैरसमज करुन घेऊ नये. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.