मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ज्यांनी मराठा समाजावर अन्याय केला तेच सत्तेत बसले, उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर प्रहार

ज्यांनी मराठा समाजावर अन्याय केला तेच सत्तेत बसले, उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर प्रहार

सर्वाना न्याय मग आमच्यावर अन्याय का? मराठा समाजाने काय पाप केलं आहे?

सर्वाना न्याय मग आमच्यावर अन्याय का? मराठा समाजाने काय पाप केलं आहे?

सर्वाना न्याय मग आमच्यावर अन्याय का? मराठा समाजाने काय पाप केलं आहे?

सातारा, 29 नोव्हेंबर: मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) स्थगिती दिल्यानंतर आरक्षणावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा मोर्च्याचे प्रतिनिधित्त्व छत्रपती घराण्याचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी करावे, अशी मागणी मराठा समाजातून केली जात आहे. त्यात मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ठाकरे सरकारवर हल्ला केला आहे.

राजकारणापोटी मराठा समाजाची अनेक प्रश्न प्रलंबित ठेवली आहेत. केवळ राजकारणासाठी मराठा आरक्षणाचा वापर केला जात आहे. ज्यांनी अन्याय केला तेच आता सत्तेत बसले आहेत, अशी घणाघाती टीका उदयनराजे यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. मंडल आयोगाच्या वेळी मराठा समाजाला आरक्षण का नाही दिलं? असा सवाल देखील उदयनराजे यांनी केला आहे.

हेही वाचा...नव्या शेतकरी कायद्यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं पंतप्रधानमोदींनी केलं कौतुक

सर्वाना न्याय मग आमच्यावर अन्याय का? मराठा समाजाने काय पाप केलं आहे? असे सवाल करत आणखी किती दिवस वाट पाहाणार? असंही उदयनराजे यांनी म्हणलं आहे. जातीमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. इतर समाजावर अन्याय झाला तरी त्यांचीही बाजू मांडत आलेलो आहे. इतर समाजाच्या लोकांनी गैरसमज करुन घेऊ नये. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे...

-जातीचे राजकारण करणाऱ्यांनी राजीनामे द्या

-मराठा समाजाला किरकोळीत घेऊ नका

-मराठा आरक्षण का झाले नाही याचा त्या त्या वेळच्या सत्येतिल नेत्यांना प्रश्न विचारा

-कोणत्या ही समाजातील नागरिकांनी गैर समाज करूनये मात्र मराठा समजवर अन्याय होतोय तो दूर व्हावा

-इतर कोणत्या ही समाजाचे अरक्षणाल धक्का न लावत मराठा समाजाला आरक्षण द्या

-मराठा समाजाला आरक्षण न देणाऱ्या सर्वांना माझा सवाल आहे

-आंदोलने केलीकी आंदोलकांवर दबाव अनला जातो आणि त्यांना तुरुंगात टाकले जाते

-माझा स्वतः चा विचार आहे तो कोना पक्षाचा विचार नाही

-मराठा समाजाचा मातासाठीच वापर केला गेला

-संभाजीराजे यांची त्या पदावर नेमणूक करा आम्ही प्रश्न एका दिवसात सोडवतो :-उदयनराजे यांचा शरद पावर यांचा प्रतिसवाल

-स्वतःचे बागा मग देवेंद्र फडणविसांवर आरोप करा

-फडणविसाना पुन्हा मुख्यमंत्री बनवा मी त्यांना आरक्षण देण्यास भाग पडतो

First published:

Tags: Maharashtra, Maratha kranti morcha, Maratha reservation, Protest maratha kranti morcha, Satara, Udayan raje bhosle