Home /News /maharashtra /

'विधानसभेत उलटा टांगेन', भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱ्याला झापले

'विधानसभेत उलटा टांगेन', भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱ्याला झापले

'साहेब आयपीएस अधिकारी आहे, त्याला काही बुद्धी आहे की नाही? आमचे शंभर आमदार आहे, उद्या विधानसभेत उलटा टांगेन',

जालना, 29 नोव्हेंबर :  भाजपचे (BJP) माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. 'आमचे शंभर आमदार आहे, उद्या विधानसभेत उलटा टांगेन', अशा शब्दांत लोणीकर यांनी परतूरच्या पोलीस निरीक्षक आणि आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून धमकावले आहे. त्यांचीही ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  परतूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे व परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी हसन गौहर यांच्याशी दूरध्वनीवरून केलेल्या वादग्रस्त संभाषणाची कॉल रिकॉर्डिंग क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बबनराव लोणीकर यांनी पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे यांना फोन करून झापले आहे. लोणीकर ऑडिओ क्लीपमध्ये काय म्हणाले? 'मला परतूरच्या दहा पंधरा व्यापाऱ्यांचे फोन आले आहे. ओमप्रकाश यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला होता. शहरात खुलेआम दारू, मटका आणि दोन नंबरचे धंदे सुरू आहे.  तुमच्या साहेबाला, काही अक्कल नाही का? तो बिचारा प्रामाणिक माणूस आहे.कोर्टाचा आदेश नसताना लोकांच्या घरात घुसता कसं काय?  तो साधा गुटखा सुद्धा खात नाही. एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरावर धाड टाकताय, सापडलं का काही? साहेब आयपीएस अधिकारी आहे, त्याला काही बुद्धी आहे की नाही? तुम्ही काय रझाकारी लावली आहे का? विधानसभेत उलटा टांगेन तुम्हा सगळ्यांना, आयपीएस अधिकारी झाला म्हणून लय मोठा झाला आहे का? विधानसभेत 100 आमदार आहे, सस्पेंड करण्याची मागणी करतील, त्याला एसपी व्हायचं आहे म्हणा, त्यामुळे माज चढल्यावाणी करू नको म्हणा." त्यानंतर बबनराव लोणीकर यांनी आयपीएस अधिकारी हसन गौहर यांना फोन केला. गौहर यांनी घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर लोणीकर यांनीही नरमाईची भूमिका घेतली. न्यूज18 लोकमतने या ऑडिओ क्लीपची शहानिशा केलेली नाही, परंतु, बबनराव लोणीकर यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. काय आहे प्रकरण? परतूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे व परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी हसन गौहर यांनी शहरातील अवैध दारूचे अड्डे, मटका आणि गुटखा साठवणूक करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे.  25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मोंढा भागात ओमप्रकाश मोर नावाच्या व्यापाऱ्यांच्या घरी छापा टाकण्यात आला होता.  पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई करण्यात आली होती. परंतु, ज्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकायचा होता, त्याच्या घराऐवजी मोर यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. पोलिसांनी आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल तातडीने दिलगिरीही व्यक्त केली. त्यानंतर मोर यांनाही यात कोणतीही हरकत घेतली नाही.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या