शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन दरम्यान, राज्यसभेत कृषीविधेयक मंजूर करताना राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी केलेल्या वर्तनावर शरद पवार प्रचंड नाराज झाले. राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं वर्तन सदनाचं अवमूल्यन करणारं असून त्याविरोधात आपण एक दिवसासाठी अन्नत्याग करणार आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं. कृषीविधेयक बिलावरून राज्यसभेत सदस्यांना दिलेल्या वागणुकीवरून शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्यावर हल्लाबोल केला होता. हेही वाचा...उदय सामंतांना Y+ with Escort सुरक्षा, धमकीचे फोन येताच सरकारनं घेतला निर्णय राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांचं संपूर्ण वर्तन सदनाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारं आणि अवमूल्यन करणारं आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी हरिवंश नारायण सिंह यांच्यावर निशाणा साधला होता. सिंह यांचं वर्तन संपूर्ण देशानं पाहिलं आहे. त्यामुळे आपला लोकप्रतिनिधी कसा वागतो? यामुळे बिहारच्या जनतेमध्ये चिंता व्यक्त केली जात असेल, असा टोलाही त्यांनी लगावला होता.शरद पवार यांच्या एक दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप नेत्याची सडकून टीका@PawarSpeaks @TawdeVinod @Dev_Fadnavis #ahmednagar pic.twitter.com/Pl4g6g9tYh
— News18Lokmat (@News18lokmat) September 25, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, BJP, NCP, Sharad pawar, Vinod tavade