मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /उदय सामंतांना Y+ with Escort सुरक्षा, धमकीचे फोन येताच सरकारनं घेतला निर्णय

उदय सामंतांना Y+ with Escort सुरक्षा, धमकीचे फोन येताच सरकारनं घेतला निर्णय

 राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई, 25 सप्टेंबर: राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. उदय सामंत यांना धमक्यांचे फोन येत असल्यामुळे त्याची सुरक्षा व्यवस्था आता वाय प्लस एस्कॉर्टसह (Y+ with Escort) दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबत गृहमंत्रालयानं राज्य गुप्तवार्ता विभाग तसेच पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा...महाराष्ट्राचं राजकारण सोडून दिल्लीत जाणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिलं हे उत्तर!

दरम्यान, शिक्षण मंत्री उदय सामंत यांना गेल्या काही दिवसांपूर्वी विद्यार्थी संघटनेकडून धमकीचा फोन आला होता. उदय सामंत हे गेल्या आठवड्यात अमरावती विद्यापीठ दौऱ्यावर होते. दौरा आटोपून ते नागपूर विद्यापीठाकडे निघणार होते. त्याचवेळी उदय सामंत यांना फोनवरून धमकी देण्यात आली होती. 'नागपूरला पोहोचू देणार नाही...', असं या धमकी देणाऱ्यानं म्हटलं होते.

नागपूरला पोहोचू देणार नाही...

उदय सामंत हे अमरावती विद्यापीठात परीक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी गेले होते. या दरम्यान काही विद्यार्थी संघटनांनी उदय सामंत यांना फोनवरून धमकी दिली होती. 'आम्ही उदय सामंत यांना नागपूरला पोहोचू देणार नाही', अशी फोन वरून धमकी दिल्याची माहिती खुद्द उदय सामंत यांनी दिली होती. मात्र, आपण अशा पोकळ धमक्यांना घाबरत नसून ज्या विद्यार्थी संघटनांना चर्चा करायचे असेल त्यांनी आपल्याशी चर्चा करावी, असं आवाहन उदय सामंत सावंत यांनी केलं होतं. आपण अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही. आपण विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करणार आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं होतं.

काही विद्यार्थी संघटना केवळ आपल्या राजकीय पक्षाला खुश करण्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला होता. हे योग्य नसल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले. काही सुधारणा असल्यास आम्ही त्याचा जरूर स्वीकार करू, असेही यावेळी उदय सावंत यांनी सांगितलं होतं.

दुसरीकडे, शिवसेनाविरुद्ध भाजप संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकीचा फोन आला होता.

उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री'वर फोन करुन धमकी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान 'मातोश्री'वर काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्याने दुबईवरुन बोलतोय, मातोश्रीला उडवून टाकी, अशी धमकी दिली होती.

उद्धव ठाकरेंच्या रायगडमधील फार्म हाउसची काही अज्ञातांनी रेकी केली होती. यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे दया नायक यांनी मोठी कारवाई करत मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. नायक यांनी कोलकातामधून आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा...अजित पवारांनी डिलीट केलं 'ते' ट्वीट; म्हणाले, कधी कधी वरिष्ठांचं पण ऐकावं लागतं

'मातोश्री' उडवून देण्याची धमकी

दुबईहून मातोश्रीवर तीन ते चार फोन करण्यात आले होते. त्यात मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलिस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. त्यानंतर मंगळवारी रायगडमधील खालापूर तालुक्यातील भिलवले येथे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाउसवर टुरीस्ट कारने आलेल्या 3-4 जणांनी रेकी केली होती.

फार्म हाऊसच्या गेटवरील सुरक्षारक्षकांकडे विचारपूस करण्यात आली होती. याप्रकरणी मुबंई एटीएसने नवी मुबंई टोल नाक्यावर रेकी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली होती.

First published:

Tags: Maharashtra, Uday samant, Udhav thackarey