मुंबई, 24 नोव्हेंबर: 'प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली, यात कसली मर्दानगी',असं म्हणणाऱ्या संजय राऊत @rautsanjay61 यांना विचारलं पाहिजे, एक महिला घरी नसताना...सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती?, असा सवाल करत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण देरेकर (Bjp leader Pravin Darekar) यांनी बॉलीवूड अभिनेतत्री कंगना रणौत (Bollywood Actress Kangana Ranaut) हिच्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut) यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे.
प्रवीण दरेकर यांनी ट्वीट करून संजय राऊत यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.
हेही वाचा...ED, CBI हे त्यांच्या हातचं बाहुलं; छगन भुजबळ यांचा भाजपवर हल्लाबोल
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्या घरावर अमंलबजावणी संचालनालयानं (ED)ने छापेमारी केली. प्रताप सरनाईक यांच्या 10 हून अधिक ठिकाणांवर ED ने कारवाई केली. धक्कादायक म्हणजे प्रताप सरनाईक यांचे चिरंजिव विहंग सरनाईक ( vihang sarnaik) यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईनंतर शिवसेनाविरुद्ध भाजप पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत.
"प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली,यात कसली मर्दानगी",असं म्हणणाऱ्या @rautsanjay61यांना विचारलं पाहिजे,एक महिला घरी नसताना...सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती?@BJP4Maharashtra @TV9Marathi @abpmajhatv @TheMahaMTB
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) November 24, 2020
या कारवाईशी भाजपचा काय संबंध?
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी असं म्हटले आहे की, 'राजकीय सूडापोटी अशाप्रकारे कोणतही कारवाई करण्याचं कारण नाही आहे. ईडी स्वतंत्र स्वायत्त आहे, कायद्याने दिलेल्या चौकटीत ते कारवाई करतात.' या कारवाईशी भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.
ते पुढे म्हणाले की, 'जर ईडीकडे काही तक्रारी आल्या असतील, तर त्यांनी केलेली त्यांच्या स्तरावरील ती कार्यालयीन कारवाई आहे. त्याच्याशी भाजपाचा संबंध असण्याचे काही कारण नाही आहे. असं असतं तर सरसकट झालं असतं, स्वैराचार माजला असता. त्यामुळे मला वाटत नाही असं जाणीवपूर्वक काही केलं आहे. यथावकाश यातील सत्य बाहेर येईल.' राजकीय सूडबुद्धीने अशाप्रकारची कारवाई झाली नसल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना दिली आहे.
दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी असे म्हटले आहे की, 'शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या परिवाराच्या अनेक कंपन्यांवर ईडीने धाड टाकली आहे. जर बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचाराचा पैसा असेल तर कारवाई व्हायलाच हवी. शिवसेना आणि त्यांचे मोठे नेते आहेत, जे मुख्य आहेत त्यांच्या परिवारांच्या उद्योगांबाबत सर्वांना माहित आहे. ईडीच्या कारवाईचं स्वागत'. किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईकांवर टीका करत सर्वच सेना नेत्यांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा...सुरुवात तुम्ही केली शेवट आम्हाला करता येतो, संजय राऊत भाजपवर भडकले
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या सुपुत्र पूर्वेश आणि विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक दाखल झाले आहे. प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे इतर नेतेही ईडीच्या रडारवर असल्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Maharashtra, Pravin darekar, Sanjay raut, Shiv sena