जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / फडणवीसांच्या ह्रदयात हिंदुत्व, आता तुम्ही झोपेत असताना कबरही...., नितेश राणेंचा ठाकरे गटावर पुन्हा हल्लाबोल

फडणवीसांच्या ह्रदयात हिंदुत्व, आता तुम्ही झोपेत असताना कबरही...., नितेश राणेंचा ठाकरे गटावर पुन्हा हल्लाबोल

नितेश राणे

नितेश राणे

गुरुवारी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 नोव्हेंबर : गुरुवारी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आलं. हे अतिक्रम हटवण्यात आल्यानंतर भाजपाच्या गोटात आता जल्लोष सुरू झाला आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला टोला लगावला आहे. अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. फक्त हातात भगवा घेवून हिंदुत्ववादी होत नाही. त्यासाठी मनात ते असावे लागते. आमच्या देवेंद्रजीच्या ह्रदयात ते आहे. त्यामुळे त्यांना हे शक्य झाले. तुम्ही एखाद्या दिवशी झोपेत असताना कबर पण हटवली जाईल असं नितेश राणे यांनी म्हटल आहे. काय म्हणाले नितेश राणे?  अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. फक्त हातात भगवा घेवून हिंदुत्ववादी होत नाही. त्यासाठी मनात ते असावे लागते. आमच्या देवेंद्रजीच्या ह्रदयात ते आहे. त्यामुळे त्यांना हे शक्य झाले. यापूर्वी महाविकास आघाडी सरकार होते. अडीच वर्षांत त्यांना साध्या तांत्रिक अडचणी देखील सोडवता आल्या नाहीत. देवेंद्रजींनी अवघ्या काही महिन्यांमध्ये ते करून दाखवले. तुम्ही एखाद्या दिवशी झोपेत असताना कबर पण हटवली जाईल. अफजल खान, औरंगजेब यांच्या कबरी आठवणी कशाला हव्यात, ज्यांनी हिंदुंना त्रास दिला त्यांच्या आठवणी आम्हाला नकोत. तुम्हाला तारीख काळ वेळ न सांगता एखाद्या दिवशी त्या हटवल्या जातील एवढे मी तुम्हाला सांगतो, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा:  अफजलखानच्या कबरीजवळचा परिसर 3 दशकांमध्ये कसा बदलला? पाहा Video ‘निर्णयाची अंमलबजावणी’  दरम्यान दुसरीकडे अतिक्रम हटवण्यात आल्यानंतर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भूसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयानेच अतिक्रमण हटवण्याबाबत निर्णय दिला होता. त्याची अंबलबजावणी आम्ही केली. दिघे साहेब देखील बोलायेच नाही तर ते थेट काम करायचे. ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद या शिंदे गटाच्या वाटेवर आहेत,  यावर देखील दादा भूसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दीपाली सय्यद येत आहेत.  अनेक लोक आमच्यासोबत येण्यास तयार असल्याचं दादा भूसे यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात