जळगाव, 25 डिसेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी होईपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आली आहे. यावरून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावताना मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिला नव्हता तर त्यांच्याकडून घेण्यात आला होता, असं स्फोटक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. आता एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाजन यांनी नेमकं काय म्हटलं? एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना जोरदार टोला लगावला आहे. एकनाख खडसे यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही तर त्यांच्याकडून तो घेण्यात आल्याचा मोठा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून एकनाथ खडसे यांचे जावई जेलमध्ये आहेत, जावायाला सोडवण्यासाठी आधी त्यांनी प्रयत्न करावेत. आपण काय पराक्रम केले आहेत हे सर्वांना माहिती असल्याचा टोलाही यावेळी महाजन यांनी खडसेंना लगावला आहे. हेही वाचा : ‘पाकिस्तान कनेक्शन होतं मग तिच्यासोबत विवाहबाह्य संबंध का?’, रुपाली ठोंबरेंचा राहुल शेवाळेंवर पलटवार संजय राऊतांवर टीका दरम्यान यावेळी गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. तुम्ही जे पराक्रम केले ते भोगावेच लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिंदे, फडणवीस सरकार सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता या आरोपाला प्रत्युत्तर देताना गेल्या तीन वर्षांच्या काळात तुम्ही काय केलं असा सवालही गिरीश महाजन यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







