जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / 'पाकिस्तान कनेक्शन होतं मग तिच्यासोबत विवाहबाह्य संबंध का?', रुपाली ठोंबरेंचा राहुल शेवाळेंवर पलटवार

'पाकिस्तान कनेक्शन होतं मग तिच्यासोबत विवाहबाह्य संबंध का?', रुपाली ठोंबरेंचा राहुल शेवाळेंवर पलटवार

'पाकिस्तान कनेक्शन होतं मग तिच्यासोबत विवाहबाह्य संबंध का?', रुपाली ठोंबरेंचा राहुल शेवाळेंवर पलटवार

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र त्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी राहुल शेवाळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे; 25 डिसेंबर :  शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांनी यावेळी ठाकरे गटाची युवासेना आणि राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राहुल शेवाळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्ही केलेल्या आरोपानुसार जर संबंधित महिलेचं पाकिस्तान कनेक्शन असेल तर तुम्ही तिच्यासोबत दीड वर्ष विवाहबाह्य संबंध ठेवले, मग या काळात तुम्ही तिला देशाशी संबंधित काही गोपनीय माहिती दिली का? अशी माहिती जी ती पाकिस्तानला सांगू शकेल असा संशय निर्माण होऊ शकतो असं ठोंबरे यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं ठोंबरे यांनी? राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी आणि युवासेनेवर गंभीर आरोप केले आहेत. या सर्व आरोपांना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिलं.  राहुल शेवाळे यांची पूर्ण पत्रकार परिषद मी ऐकली नाही. मात्र त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये युवासेनेवर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचा दाऊदशी संबंध जोडला आहे. ते हा सर्व पोरखेळ सुरू असल्यासारखं बोलले आहेत. एक खासदार सत्तेचा गैरेवापर कसा करतो याचं उत्तम उदाहरण म्हणेज राहुल शेवाळे आहेत. या महिलेच्या जीवाला धोका आहे. खासदार असताना महिलेला सक्षम केलं पाहिजे, मात्र त्रास दिला जात आहे. आमच्याकडे 40 पानांचा पुरावा आहे, मात्र मीडिया ट्रायल चालवणारी मी वकील नाही, हे सगळं कोर्टात चाललं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मात्र तुम्हाला हाऊस असेल तर आम्ही हे सर्व पुरावे मीडियासमोर देखील दाखवू असा इशारा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे. हेही वाचा :      माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे दाऊदशी संबंध; तिला आदित्य ठाकरेंनी पाठिशी घातलं, राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांचा नेमका आरोप काय?    शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपानंतर आता राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. माझ्यावर ज्या महिलेने आरोप केले, त्या महिलेसोबत माझं कोणतंही रिलेशनशिप नव्हतं असं शेवाळे यांनी म्हटलं आहे. तसेच ज्या महिलेने आरोप केले त्या महिलेचं कुटुंब गुन्हेगारी पार्श्वभूमीचं असल्याचा आरोपही राहुल शेवाळे यांनी केल आहे. तसंच या महिलेचं पाकिस्तान कनेक्शन असल्याच दावा देखील त्यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात