मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नरेंद्र मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्याला भाजपनं दिली उमेदवारी, खडसेंचा पारा चढला

नरेंद्र मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्याला भाजपनं दिली उमेदवारी, खडसेंचा पारा चढला

ज्यांनी पक्षाला, नेत्यांना शिव्या घातल्या त्यांना उमेदवारी? ज्यांनी पक्षविरोधी काम केलं त्यांना उमेदवारी?

ज्यांनी पक्षाला, नेत्यांना शिव्या घातल्या त्यांना उमेदवारी? ज्यांनी पक्षविरोधी काम केलं त्यांना उमेदवारी?

ज्यांनी पक्षाला, नेत्यांना शिव्या घातल्या त्यांना उमेदवारी? ज्यांनी पक्षविरोधी काम केलं त्यांना उमेदवारी?

भुसावळ, 8 मे: विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपनं विधानपरिषद निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने डॉ.अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजित सिंग मोहिते यांना संधी देत पुन्हा एकदा निष्ठावंताना डावललं आहे.

भाजपच्या या भूमिकेमुळे ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. ज्यांनी पक्षाला, नेत्यांना शिव्या घातल्या त्यांना उमेदवारी? ज्यांनी पक्षविरोधी काम केलं त्यांना उमेदवारी? एवढं नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्याला पक्षानं उमेदवारी दिली आहे. असे प्रश्न एकनाथ खडसेंनी उपस्थित केले आहेत. भाजप कोणत्या दिशेनं चालला आहे, हे चिंतन करण्याची गरज असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

हेही वाचा.. पंकजा मुंडे, एकनाथ खडसेंना पुन्हा डावललं, भाजपनं जाहीर केली या उमेदवारांची नावं

40-42 वर्षांपासून पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. त्यामुळे विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. एवढंच नाही तर माझ्यासह पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावांची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात होती. मात्र, शुक्रवारी पक्षाने जाहीर केलेल्यात निष्ठावंतानाच डावलल्याचं आश्चर्य वाटल्याचं एकनाथ खडसे यांना सांगितलं.

'गो बॅक मोदी' असा नारा देणाऱ्याला उमेदवारी..

एकनाथ खडसे म्हणाले,धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकला होता. 'गो बॅक मोदी' अशा घोषणा दिल्या होत्या. पंतप्रधानांच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्याला विधानपरिषदेवर संधी दिली जाते. पण निष्ठावंताना डावललं जातं. त्यामुळे पक्ष कोणत्या दिशेनं चालला आहे, हे चिंतन करण्याची गरज आहे.

हेही वाचा.. मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनं शरद पवारही व्यथित, ट्वीट करुन व्यक्त केलं

दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून अडगळीत पडलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे विधानपरिषदेसाठी इच्छूक होते. त्यांनी उमेदवारी साठी आग्रह धरला होता. त्याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावरही घातलं होतं. पण, यावेळीही त्यांना डच्चू देण्यात आला आहे. एकनाथ खडसेसोबत पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गजांनाही डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता या निष्ठावंतांचे राजकीय पुनर्वसन पुन्हा लांबणीवर पडल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Eknath khadse, Maharashtra politics