मुंबई, 8 मे: देशात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून लॉकडाऊनमुळे बेरोजगार व्हावं लागलेल्या काही मजुरांनी पायीच घराची वाट धरली आहे. या संकटाच औरंगाबादजवळील करमाड येथे तब्बल 16 मजुरांना मालगाडीने चिरडलं. यात 16 मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहेत. या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
'औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत.', अस शरद पवार यांनी ट्वीट केलं आहे.
औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 8, 2020
तसेच असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल तर सर्वप्रथम त्याच्या रोजगाराच्या ठिकाणच्या कॉन्ट्रॅक्टर अथवा मालकाने त्यांची काळजी घ्यावी. ते शक्य होत नसल्यास सरकारला कळवावं, असही शरद पवार यांनी म्हटलं आहे. देशातल राज्य सरकारांनीही या स्थलांतरित मजुरांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करून सातत्याने त्यांचा पाठपुरावा करावा. त्यांच्या गरजांबाबत काळजी घ्यावी. केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रित येऊन तातडीने दखल घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी विनंती देखील शरद पवार यांनी केली आहे.
असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल तर सर्वप्रथम त्याच्या रोजगाराच्या ठिकाणच्या कॉण्ट्रॅक्टर अथवा मालकाने त्यांची काळजी घ्यावी. ते शक्य होत नसल्यास सरकारला कळवावं.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 8, 2020
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झालेला हा रेल्वे अपघात व्यथित करणारा आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोललो असून, ते परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आवश्यक सर्व सहकार्य केलं जात आहे, असंही मोदींनी सांगितलं आहे.
हेही वाचा...तरुणीच्या अंत्यदर्शनाला जाऊन 45 जणांनी धोक्यात घातला जीव, नंतर झालं असं..
मृत मजुरांच्या कुटुंबीयांसाठी मदतीची घोषणा
परराज्यातील 16 मजुरांची दुर्दैवी मृत्यूबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख व्यक्त केलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत.
दुसरीकडे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्वीट करता या घटनेचं दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
हेही वाचा.. जीवावर उदार होऊ नका..मृत मजुरांच्या कुटुंबीयांसाठी उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा
मृत्यूनं वाटेत असं गाठलं...
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सर्व मजूर मध्य प्रदेशातील आहेत. ते जालन्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. रात्री जालन्याहून भुसावळला निघाले होते. मजुरांनी 45 किलोमीटरचा पायी प्रवास करून करमाड येथे पोहोचले होते. तिथून ते भुसावळला जाऊन स्पेशल ट्रेनने मध्य प्रदेशात जाणार होते. पायी चालून थकलेले मजूर करमाड गावाजवळ रेल्वे रूळावरच थांबले. त्यांना झोप लागली आणि ती त्यांच्यासाठी काळझोपच ठरली. मालगाडी येत असल्याचंही त्यांना समजलं नाही. जालन्याकडून आलेली मालगाडी या मजुरांना चिरडून निघून गेली. या अपघातात 16 मजुरांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले. याअपघातात तिघे थोडक्यात बचावले आहेत.
चौकशीचे आदेश...
दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे हे मजूर मिळेल त्या रस्त्याने घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sharad pawar