मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पंकजा मुंडे, एकनाथ खडसेंना पुन्हा डावललं, भाजपनं जाहीर केली या उमेदवारांची नावं

पंकजा मुंडे, एकनाथ खडसेंना पुन्हा डावललं, भाजपनं जाहीर केली या उमेदवारांची नावं

भाजपने विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून तीन ओबीसी आणि एक मराठा मैदानात उतरवला आहे.

भाजपने विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून तीन ओबीसी आणि एक मराठा मैदानात उतरवला आहे.

भाजपने विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून तीन ओबीसी आणि एक मराठा मैदानात उतरवला आहे.

मुंबई, 8 मे: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेलाच मतमोजणीही होणार आहे.  विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने डॉ.अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजित सिंग मोहिते यांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या बंडखोरांना चाप लावल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा..जीवावर उदार होऊ नका,मृत मजुरांच्या कुटुंबीयांसाठी उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा

भाजपने विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून तीन ओबीसी आणि एक मराठा मैदानात उतरवला आहे. डॉ. अजित गोपचडे आणि प्रवीण दटके ओबीसी, गोपीचंद पडळकर धनगर नेते तर रणजितसिंह मोहिते पाटील हे मराठा असा जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. भाजपचे सर्व उमेदवार दुपारी 2 वाजता विधानभवनात उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थितीत राहणार आहेत.

हेही वाचा..PM मोदींच्या नेतृत्वाचा भारताला फायदा की तोटा? राहुल गांधी म्हणाले...

दुसरीकडे, गेल्या कित्येक दिवसांपासून अडगळीत पडलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे विधानपरिषदेसाठी इच्छूक होते. त्यांनी उमेदवारी साठी आग्रह धरला होता. त्याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावरही घातलं होतं. पण, यावेळीही त्यांना डच्चू देण्यात आला आहे. एकनाथ खडसेसोबत पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गजांनाही डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता या निष्ठावंतांचे राजकीय पुनर्वसन पुन्हा लांबणीवर पडल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान,  सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. सध्याच्या संख्याबळानुसार विधानपरिषदेत भाजपच्या 3 जागा सहज निवडून येऊ शकतात. चौथ्या जागेसाठी काही मतं कमी पडतील, त्यामुळे भाजप मित्रपक्ष आणि अपक्षांची मदत घेण्यासाठी कंबरही कसली आहे. तसं पाहिलं तर ही निवडणून बिनविरोध होणं अवघड आहे. तरी देखील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपला 4, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 2 तर काँग्रेसला एका जागेवर निवडणूक लढवावी लागणार आहे. मात्र, काँग्रेसने आधीच 2 जागा लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मते हवी आहेत. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Pankaja munde