मुंबई, 21 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला होता. उपचारानंतर धनंजय मुंडे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे, पंकजा मुंडे या बीडमध्ये नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. 4 जानेवारीला परळीमध्ये मध्यरात्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातानंतर धनंजय मुंडेंना परळीमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण नंतर पुढच्या उपचारांसाठी मुंडेंना विमानाने मुंबईला आणण्यात आलं होतं. धनंजय मुंडे यांची सातवी आणि आठवी बरगडी फ्रॅक्चर झाली आहे, त्यामुळे त्यांना ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे उपचारानंतर मुंडेंना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. ( मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेआधी धक्कादायक प्रकार, एकाला अटक ) धनंजय मुंडे रुग्णालयात असताना देवेंद्र फडणीस यांनी त्यांची भेट होऊ शकली नव्हती म्हणून धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. मुंबईच्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंवर सुरू असलेल्या उपाचारांबाबत डॉक्टरांकडूनही माहिती घेतली होती. (‘आता सगळ्यांनी गोड गोड बोलायचं’, एकनाथ शिंदेंची शरद पवारांच्यासमोर जोरदार बॅटिंग) दरम्यान, ‘बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये, आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या,’ असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली मनातली भावना बोलून दाखवली. तर, ‘पंकजा मुंडेंना जबाबदारी देण्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करणार आहे तसंच राज्यातील पक्ष श्रेष्ठींना कार्यकर्त्यांच्या भावना सांगणार’ असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ‘पंकजाताई त्यांचा जिल्हा चांगला सांभाळत आहेत, त्याच्याकडे राष्ट्रीय नेतृत्व आहे. एक चांगल्या नेत्या आहे. राष्ट्रीय सचिव आहे, त्यामुळे त्यांना कुठल्या ठिकाणी आडकाठी नाही. बाहेरच्या लोकांनी येऊन ढवळाढवळ करून नका या पंकजा मुंडेंच्या भावना आहे. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी आहे असंही बावनकुळे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







