मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'आता सगळ्यांनी गोड गोड बोलायचं', एकनाथ शिंदेंची शरद पवारांच्यासमोर जोरदार बॅटिंग

'आता सगळ्यांनी गोड गोड बोलायचं', एकनाथ शिंदेंची शरद पवारांच्यासमोर जोरदार बॅटिंग

'पवार साहेब अनुभवी नेते आहे, त्यांचं योगदान मोठं आहे म्हणून कुठला माणूस सत्तेवर आहे, हे न पाहता ते नेहमी मार्गदर्शन करत असतात'

'पवार साहेब अनुभवी नेते आहे, त्यांचं योगदान मोठं आहे म्हणून कुठला माणूस सत्तेवर आहे, हे न पाहता ते नेहमी मार्गदर्शन करत असतात'

'पवार साहेब अनुभवी नेते आहे, त्यांचं योगदान मोठं आहे म्हणून कुठला माणूस सत्तेवर आहे, हे न पाहता ते नेहमी मार्गदर्शन करत असतात'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 21 जानेवारी : 'मागच्या आठवड्यात मकरसंक्रांत झाली आहे. त्यामुळे सगळ्यांनीच गोड गोड बोलायचं आहे. तीनच दिवसांपूर्वी मी दावोसला जाऊ आलो. शरद पवार साहेब अनुभवी आहे, त्यांना माहिती आहे. कुणी काही म्हटलं तरी सुद्धा तिथून आपल्या राज्यासाठी भरपूर गुंतवणूक आणली आहे' असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादींच्या नेत्यांना सल्लावजा टोला लगावला आहे. तसंच, यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत अमित शहा यांच्याकडेही सहकार क्षेत्राबद्दल मदत मागत असल्याचे सांगितलं आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच व्यासपीठावर आले. पुण्यातील मांजरीमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 46 व्या सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं.

" isDesktop="true" id="818021" >

दरम्यान, 'मागच्या आठवड्यात मकरसंक्रांत झाली आहे. त्यामुळे सगळ्यांनीच गोड गोड बोलायचं आहे. तीनच दिवसांपूर्वी मी दावोसला जाऊ आलो. शरद पवार साहेब अनुभवी आहे, त्यांना माहिती आहे. कुणी काही म्हटलं तरी सुद्धा तिथून आपल्या राज्यासाठी भरपूर गुंतवणूक आणली आहे, त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यांची गुंतवणूक राज्यातील वेगवेळ्या भागात होणार आहे.तुम्हा सगळ्यांच्या सहकार्य राहणार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

(पंकजा मुंडेंच्या बीडमध्ये कोण करतंय ढवळाढवळ? बावनकुळे म्हणाले...)

'पवार साहेब अनुभवी नेते आहे, त्यांनी राज्यात आणि देशामध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्यात. त्यांचं योगदान मोठं आहे म्हणून कुठला माणूस सत्तेवर आहे, हे न पाहता, राज्याच्या हितासाठी, राज्यातील सर्वसामान्यांना मदत होण्यासाठी ते नेहमी मार्गदर्शन करत असतात. जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा तेव्हा ते मला फोन करत असता, मार्गदर्शन करत असतात, त्यांच्या सहकार्य क्षेत्रातील योगदान नाकारता येणार नाही, असं स्तुतीसुमनंही शिंदेंनी पवारांवर उधळली.

देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. प्रथमच सहकार मंत्रालयाची स्थापन झाली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा अमित शहा यांना भेटतो, त्यावेळी महाराष्ट्रात सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये तुमच्या मदतीची गरज आहे. सहकार क्षेत्रामध्ये ज्या अडचणी आहे, त्या दूर झाल्या पाहिजे, ते सकारात्मक दृष्टीकोनातून झालं पाहिजे, असंही एकनाथ शिंदेंनी आवर्जुन सांगितलं.

(मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेआधी धक्कादायक प्रकार, एकाला अटक)

तर,  भारताचे साखर उत्पादन यावर्षी 38 दशलक्ष टन होईन असा अंदाज आहे. गेल्या वर्षी तर भारताने तब्बल 39 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन करून ब्राझील ला मागे टाकत जगात पहिला क्रमांक पटकावला तर देशात महाराष्ट्राने प्रथन क्रमांक पटकावला. यंदा साखर उत्पादनात घट होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नसल्याने साखरेचा बफर स्टॉक कारखान्यांकडे पडून आहे म्हणून कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती वाढवावी जेणेकरून साखर घंद्यातील तूट भरून निघेल, असं शरद पवार म्हणाले.

First published:

Tags: Cm eknath shinde, Sharad Pawar, शरद पवार