मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मुंबई-पुण्याचे म्हणूनच विदर्भावर अन्याय, भाजप नेत्याचा सणसणीत आरोप

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मुंबई-पुण्याचे म्हणूनच विदर्भावर अन्याय, भाजप नेत्याचा सणसणीत आरोप

नागपूर अधिवेशन रद्द केलं, वैधानिक विकास महामंडळ गुंडाळलं....

नागपूर अधिवेशन रद्द केलं, वैधानिक विकास महामंडळ गुंडाळलं....

नागपूर अधिवेशन रद्द केलं, वैधानिक विकास महामंडळ गुंडाळलं....

गडचिरोली, 25 नोव्हेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईचे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे असल्याने विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोलीत केला आहे.

नागपूर अधिवेशन रद्द करणे, वैधानिक विकास महामंडळ गुंडाळणं, आपत्ती निधीत दुजाभाव यावरून हे स्पष्ट झालं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. विदर्भातील जिल्ह्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मंजूर झालेला निधी देखील ठाकरे सरकारनं रोखला आहे, असा घणाघाती आरोप बावनकुळे यांनी केली आहे.

हेही वाचा...'लव्ह जिहाद' कायद्यावरून भाजपला घरचा आहेर, शिवेंद्रसिंहराजेंना केला कडाडून विरोध

पदवीधर मतदारसंघाच्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी चंद्रशेखर बावनकुळे गडचिरोलीत आले होते. यावेळी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा विदर्भ दौरा अद्यापही झालेला नाही. विशेष म्हणजे असं पहिल्यांदा होत आहे. नागपूर अधिवेशन रद्द करणे, वैधानिक विकास महामंडळ गुंडाळणे, आपत्ती निधीत विदर्भावर दुजाभाव यावरून मुंबई, पुण्याची मंडळी विदर्भावर अन्याय करत असल्याचं स्पष्ट झाल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

विदर्भातील जिल्ह्यांना देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेला निधी देखील उद्धव ठाकरे सरकारनं रोखल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. हे विदर्भावर अन्याय करणारे सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अजितदादांवर फडणवीसांचा पलटवार

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती होत आहे. तर दुसरीकडे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं नेमकं काय दुखणं आहे, हे मला चांगलं माहीत आहे' असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

पुण्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'ईडी तपासाचा भाग पूर्ण करेल. पण, प्रताप सरनाईक हे ईडीला समोर का जात नाहीत. ते सेनेच्या नेत्यांशी भेटता, चर्चा करतात आणि नंतर क्वारंटाइन होतात. त्यामुळे त्यांनी न घाबरता ईडीला सामोरं गेले पाहिजे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

'संजय राऊत यांनी काल सांगितले होते की, 100 नेत्यांची यादी केंद्राकडे पाठवणार आहे आणि आज राऊत म्हणाले की, आधी चौकशी होऊ द्या, मग यादी पाठवतो. आम्हीपण त्यांच्या यादीची वाट पाहत आहोत त्यांना जेव्हा यादी पाठवायची आहे, त्यांनी पाठवावी', असं जोरदार प्रत्युत्तर फडणवीस यांनी राऊतांना दिले.

हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची लवकरच विशेष मुलाखत, काय बोलणार याकडे लक्ष

'हे अनैसर्गिक सरकार आहे. राजकारणाच्या इतिहासात असे सरकार कधीच टीकच नाही. त्यामुळे आम्ही सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही. हे सरकार कोसळल्यानंतर आम्ही पर्यायी सरकार स्थापन करू', असंही फडणवीस यांनी सांगितले.

First published:

Tags: Ajit pawar, Udhav, Udhav thackarey