मुंबई, 25 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारला (mva government) एक वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकट मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध होणार आहे. शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांची रोखठोक मुलाखत घेतली आहे. मागील वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद विकोपाला गेला. ‘दिलेल्या शब्दाला जागे राहा’, असं सांगत सेनेनं मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. 105 जागा निवडून आल्यामुळे भाजप मुख्यमंत्रिपदावर ठाम होते. पण, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल वचन दिले होते, असं सांगत उद्धव ठाकरे यांनीही मागे न हटण्याची भूमिका घेतली. पण, भाजपने नकार दिला.त्यामुळे सेनेनं, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. सरकारमधील तिघांच्या वादामुळे मराठा आरक्षणाचं मातेरं झालं, चंद्रकांतदादा भडकले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यास आता वर्षपूर्ती होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकट मुलाखत पाहण्यास मिळणार आहे. 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही खास मुलाखत घेतली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. सहा महिन्यांपूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे यांची मुलाखत पाहण्यास मिळाली होती. गर्लफ्रेंडने लग्नासाठी टाकला दबाव, त्यानं तिच्या पालकांसह स्वत:लाही मारली गोळी आता कोरोनाची परिस्थिती, राज्यपालांशी संघर्ष, भाजपचे मिशन लोटस, केंद्र सरकारकडून न मिळालेली मदत या मुद्यांवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ चौफेर धडाडणार आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामाकाजाचा आढावा या मुलाखतीत कशा प्रकारे मांडणार हेही पाहण्याचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.